बाजारात भूकंप, पण त्यातही रॉकेट बनला हा शेअर; जुने रेकॉर्ड मोडले, दिग्गज गुंतवणूकदाराचा मोठा डाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:10 IST2025-01-21T18:05:41+5:302025-01-21T18:10:17+5:30
हा शेअर जवळपास 9 टक्क्यांनी वधारून 899.50 रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला...

बाजारात विक्रीचे वातावरण असतानाच मंगळवारी केआरएन हीट एक्सचेन्जर (केआरएन)चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली होती. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी हा शेअर जवळपास 9 टक्क्यांनी वधारून 899.50 रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला.
हा शेअरच्या 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. याच बरोबर या शेअरने 6 डिसेंबर, 2024 च्या आपल्या 876 रुपयांचा गेला उच्चांकही मागे टाकला आहे. डिसेंबर 2024 मध्ये हा शेअर 402.40 रुपयांच्या पातळीपर्यंत आला होता. हा शेअरच्या 52 आठवड्यांचा निचांक आहे.
दिग्गज गुंतवणूकदाराचा मोठा डाव - शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, केआरएन हीट एक्सचेंजरमध्ये दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांची एक टक्का एवढी गुंतवणूक आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाही दरम्यान मुकुल अग्रवाल यांची कंपनीमध्ये 1.6 टक्के अथवा 10,00,000 शेअरची हिस्सेदारी होती.
याशिवाय कंपनीत प्रमोटर्सची हिस्सेदारी 70.79 टक्के एवढी आहे. तसेच पब्लिक शेयरहोल्डर्सची हिस्सेदारी 29.21 टक्के आहे.
अक्टोबर 2024 मध्ये कंपनीचे लिस्टिंग - स्टॉक एक्सचेंजमध्ये ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सूचीबद्ध झाल्यापासून हा स्टॉक त्याच्या सर्वोच्च पातळीवर व्यवहार करत होता. गेल्या तीन दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे केआरएनचे बाजार मूल्य त्याच्या २२० रुपयांच्या इश्यू प्राइसवरून ३०९ टक्क्यांनी वाढले आहे.
सप्टेंबर तिमाहीचे निकाल - दरम्यान, सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या प्रॉफिटमध्ये (वार्षिक आधारावर) 43 टक्क्यांची वाढ दिसून आली. जो 12.31 कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 27.96 टक्क्यांनी वाढून 91.1 कोटी रुपये झाला. जो एक वर्षापूर्वीच्या तिमाहीत 71.19 कोटी रुपये होता. तसेच, कंपनीचे उत्पन्न (EBITDA) वार्षिक आधारावर ३६.४ टक्क्यांनी वाढून १९५.५३ कोटी रुपये झाले आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)