एलन मस्क यांचे १ लाख कोटी रुपये स्वाहा! मुकेश अंबानी, गौतम अदानींची संपत्तीही घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 16:07 IST2025-02-23T15:59:21+5:302025-02-23T16:07:11+5:30

Billionaire Wealth Decrease: जगभरातील धनकुबेरांच्या संपत्तीमध्ये अचानक मोठी घट झाली आहे. बिलेनिअर एलन मस्कपासून ते अदानींपर्यंत अनेकांना आर्थिक फटका बसला आहे.

जगातील टॉप १० यादीमधील श्रीमंतापैकी बर्नार्ड अर्नाल्ट यांचे नाव वगळता इतर श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये घट झाल्याचे बघायला मिळाले. पण, सर्वात जास्त संपत्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची घटली आहे.

ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्समध्ये जगातील श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये रविवारी घट झाली. यात सर्वात जास्त फटका एलन मस्क यांना बसला असून, त्यांची नेटवर्थ ११.९ अरब डॉलरने (जवळपास १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त) कमी होऊन ३८५ अरब डॉलरवर आली आहे. या वर्षात मस्क यांना ४७ अरब डॉलरचे नुकसान सोसावे लागले आहे.

मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची नेटवर्थ ३.८७ अरब डॉलरने (३३,५३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त) कमी झाली असून, २४१ अरब डॉलरवर आली आहे.

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या नेटवर्थमध्ये ५.८१ अरब डॉलरने (५०,३४३ कोटी रुपयांपेक्षा जास्त) घट झाली आहे. त्यांची संपत्ती आता २३७ अरब डॉलर इतकी आहे.

पाचव्या क्रमांकावर Larry Elison हे असून, त्यांनाही मोठा फटका बसला आहे. ८.०३ अरब डॉलर (६९,४९२ कोटी रुपयांपेक्षा) इतकी कमी झाली आहे. त्यांची नेटवर्थ १९२ अरब डॉलरवर आली आहे. तर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांची संपत्ती १ अरब डॉलरने घटली असून, १६८ अरब डॉलरवर आली आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची नेटवर्थही ८७३ अरब डॉलरने कमी झाली आहे.

श्रीमंतांच्या या यादीत असलेले रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनाही फटका बला आहे. मुकेश अंबानी यांची नेटवर्थ ४१५ मिलियन डॉलर (जवळपास ३५९५ कोटी रुपये) इतकी घटून ८७.३ अरब डॉलरवर आली आहे. मुकेश अंबानी या यादीत आता १७व्या स्थानी आले आहेत.

अदानी उद्योग समूहाचे गौतम अदानी यांना मोठा फटका बसला आहे. त्यांची नेटवर्थ १.४१ अरब डॉलरने (१२२१७ कोटी रुपयांपेक्षा जास्त) कमी झाली आहे. ब्लूमबर्गनुसार, गौतम अदानींची संपत्ती ६५.४ अरब डॉलर इतकी आहे. ते श्रीमंतांच्या यादीत आता २३ व्या स्थानावर गेले आहेत. अदानींना या चालू वर्षात १३.३ अरब डॉलर्सचा मोठा फटका बसला आहे.