EMI: या बँकांची ईएमआय वाढणार, तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेचा समावेश तर नाही ना? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 04:21 PM 2022-04-20T16:21:12+5:30 2022-04-20T16:26:18+5:30
EMI News: देशातील अनेक मोठ्या बँकांनी हल्लीच एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. जर तुम्हीसुद्धा होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोक घेतलेलं असेल तर एमसीएलआर वाढल्यानंतर व्याजदर वाढणे निश्चित आहे. याचा थेट परिणाम तुमच्या ईएमआयवर पडणार आहे. गेल्या काही दिवसांत व्याज दर वाढलेल्या बँकांचा समावेश पुढीलप्रमाणे आहे. देशातील अनेक मोठ्या बँकांनी हल्लीच एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. जर तुम्हीसुद्धा होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोक घेतलेलं असेल तर एमसीएलआर वाढल्यानंतर व्याजदर वाढणे निश्चित आहे. याचा थेट परिणाम तुमच्या ईएमआयवर पडणार आहे. गेल्या काही दिवसांत व्याज दर वाढलेल्या बँकांचा समावेश पुढीलप्रमाणे आहे.
भारतीय स्टेट बँकेने (SBI) सोमवारी एमसीएलआरमध्ये १० आधारभूत अंक (०.१० टक्के) एवढी वाढ केली होती. त्यामुळे बँकेची सर्वप्रकारची कर्जे महाग झाली आहेत.
बँक ऑफ बडोदानेही १२ एप्रिलपासून व्याजदरात ०.०५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाच्या ईएमआयचा आकडा वाढणार आहे.
अॅक्सिस बँकेनेही आपल्या कर्जाच्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे. बँकेने एमसीएलआरमध्ये ०.०५ टक्क्यांची वाढ केली आहे. वाढलेले व्याजदर १८ एप्रिलपासून लागू झाले आहेत.
कोटक महिंद्रा बँकेनेही एमसीएलआरमध्ये वाढ करून कर्जदारांना धक्का दिला आहे. बँकेकडून वाढवलेले दर १६ एप्रिलपासून लागू झाले आहेत.
एमसीएलआर एक परिमाण आहे ज्यामधून कुठलीही बँक अंतर्गत खर्च आणि लागणारा निधी या आधारावर व्याज दर निश्चित करतात.