Flipkart-Amazonवरुन खरेदी करताना 'हा' नंबर टाका, 8000 ते 10000 रुपयांची होईल बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 05:41 PM2022-03-14T17:41:35+5:302022-03-14T17:45:28+5:30

Flipkart-Amazon वर मोठा डिस्काउंट मिळवण्यासाठी कुठल्याही ऑफरची आवश्यकता नाही, फक्त एका नंबरवरुन तुमची मोठी बचत होऊ शकते.

सध्या Amazon आणि Flipkart या ऑनलाईन शॉपींग साइटवर तुम्हाला कुठल्याही वस्तुवर मोठ्या डिस्काउंटसह विविध ऑफर मिळतात.

अनेकदा ₹ 40,000 ते ₹ 100000 रुपये किमतीच्या उत्पादनांवर भरघोस सूट दिली जाते, तर कधी कुठलीही सूट मिळत नाही.

एखाद्या उत्पादनावर कुठलीही सूट मिळत नसेल, तरीदेखील तुम्ही त्यावर डिस्काउंट मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला असाच एका ट्रीकबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता.

तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला ई-कॉमर्स साइटवर सर्व तपशील भरावे लागतात, तुमच्या पत्त्यासह पेमेंट पद्धतही निवडावी लागेल.

तुम्ही ही सर्व माहिती ई-कॉमर्स साइटवर अपडेट केल्यानंतर तुम्हाला जीएसटी तपशील विचारला जातो. तुमच्याकडे जीएसटी क्रमांक असेल, तर त्याची माहिती भरुन तुम्ही एक उत्तम ऑफर मिळवू शकता.

जेव्हा तुम्ही उत्पादनाच्या खरेदीदरम्यान GST तपशील भरता तेव्हा, उत्पादनाच्या खरेदीनंतर त्यातील सुमारे 28 टक्के रक्कम कॅशबॅकच्या रुपात परत केली जाते.

तुम्हाला किती कॅशबॅक दिला जाईल हे पूर्णपणे उत्पादनावर अवलंबून असते. पण, तुमच्याकडे जीएसटी क्रमांक असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला अशा प्रकारचा कॅशबॅक मिळणार नाही.

तुमच्याकडेही जीएसटी क्रमांक असेल, तर तुम्ही ही ट्रीक वापरुन पाहायला हवी. ही ट्रीक अजून ट्राय केली नसेल, तर आताच ट्राय करा आणि आपले हजारो रुपये वाचवा.