Entry of Google Wallet in India Find out how different it will be from Google Pay
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 03:01 PM2024-05-08T15:01:31+5:302024-05-08T15:04:42+5:30Join usJoin usNext सध्या अँड्रॉईड युजर्संना गुगल वॉलेट वापरता येणार आहे. गुगलने भारतात वॉलेट लाँच केले आहे. Google Wallet प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येते. वापरकर्ते Google Wallet मध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, लॉयल्टी कार्ड आणि गिफ्ट कार्ड वापरु करू शकतात. गुगलने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी डिजिटल वॉलेट उपलब्ध करून दिले आहे. कंपनीने सांगितले की, अँड्रॉइड वापरकर्ते त्यांचे कार्ड, चित्रपटाची तिकिटे, बोर्डिंग पास, की आणि आयडी गुगल वॉलेटद्वारे सुरक्षितपणे साठवू शकतात. हे Google Pay ॲपपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. Google Pay पैसे आणि वित्त व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जाते. गुगलच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, गुगल पे बंद होणार नाही. हे आमचे प्राथमिक ॲप राहील. आम्ही नॉन-पेमेंट हेतूंसाठी Google Wallet तयार केले आहे. लोकांची डिजिटल कागदपत्रे एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी गुगल वॉलेट उपयुक्त ठरेल. वॉलेटमुळे तुमची दैनंदिन कामे सुलभ होतील, असा गुगलचा दावा आहे. गुगल वॉलेटने भारतातील २० मोठ्या ब्रँडशी करार केला आहे. यामध्ये पीव्हीआर आयनॉक्स, एअर इंडिया, इंडिगो, फ्लिपकार्ट, पाइन लॅब्स, कोची मेट्रो आणि अभिबस यांचा समावेश आहे. याच कारणामुळे गुगल वॉलेटच्या मदतीने तुम्हाला चित्रपट किंवा कार्यक्रम पाहणे, प्रवास करणे, लॉयल्टी आणि गिफ्ट कार्ड वापरणे, सार्वजनिक वाहतूक वापरणे आणि तुमचे महत्त्वाचे दस्तऐवज वापरणे यामध्ये मदत होईल. Google Pay पूर्वी Android Pay म्हणून ओळखले जात होते. हे Google ने मोबाईल पेमेंट सेवा म्हणून विकसित केले आहे. Google Pay च्या मदतीने तुम्ही कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा घड्याळावरून पेमेंट करू शकता. वापरकर्ते पिन, पासकोड किंवा बायोमेट्रिक्सच्या मदतीने सुरक्षित पेमेंट करू शकतात. Google Pay सध्या भारतासह ७९ देशांमध्ये उपलब्ध आहे.टॅग्स :गुगल पेगुगलgoogle paygoogle