EPFOची नवीन सुविधा, करोडो खातेधारकांना होणार फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 05:34 PM2020-03-04T17:34:09+5:302020-03-04T17:53:07+5:30

प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी त्याच्या प्रॉव्हिडेंट फंडातील (पीएफ) निधी महत्त्वाचा असतो.

या निधीमुळे लोक आपले भविष्य सुरक्षित करू शकतात. पीएफच्या माहितीसाठी UAN नंबर जास्त गरजेचा असतो.

UAN नंबरच्या माध्यमातून प्रॉव्हिडेंट फंड अकाउंटची माहिती समजते.

याच प्रकारे रिटायरमेंटवेळी पेन्शन पेमेंट ऑर्डरची (PPO) गरज असते. यासाठी 12 अंकांचा एक नंबर असतो.

आता ईपीएफओने एक खास सुविधा सुरु केली आहे. या नवीन सुविधेच्या माध्यमातून तुम्ही सरकारच्या ई-लॉकर सर्व्हिस DigiLocker पासून आपला UAN/PPO नंबर काढू शकता.

ईपीएफओच्या या सुविधेचा फायदा देशातील करोडो पीएफ खातेधारकांना मिळणार आहे. डिजिलॉकरची वेबसाइट https://digilocker.gov.in/ वरून तुम्ही UAN/PPO नंबर काढू शकता.

यासाठी आपल्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार नंबरच्या आधारे तुम्ही आपला डिजिटल लॉकर उघडू शकता.

दरम्यान, यासाठी आपल्याला स्वत:चे अकाउंट तयार करावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडिया प्रोग्रॉमच्या माध्यमातून डिजिटल लॉकरची सुरुवात केली होती.

इंटरनेटच्या आधारे या सेवेच्या माध्यमातून जन्म दाखला, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाण पत्र यासारखी महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन ठेवू शकता.

यासाठी आपल्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार नंबरच्या आधारे तुम्ही आपला डिजिटल लॉकर उघडू शकता.