EPFO: एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचेत? घर बसल्या होणार काम, पाहा प्रोसेस By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 08:18 PM 2021-09-05T20:18:12+5:30 2021-09-05T20:23:39+5:30
EPFO News Alert: जर तुम्ही कंपनी बदलली असेल आणि तुम्हाला जर तुमच्या ईपीएफओ खात्यातील पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. आता घरबसल्याही करता येणार काम. जर तुम्ही अनेक कंपन्या बदलल्या असतील आणि तुमचे पैसे वेगवेगळ्या PF खात्यांमध्ये जमा झाले असतील आणि तुम्हाला ते नवीन खात्यात ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही. हे काम तुम्ही घरी बसून देखील करू शकता. फक्त यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
तुमच्या UAN आणि पासवर्डसह तुमच्या EPF खात्यात लॉग इन करा. ऑनलाइन सेवा टॅबमधील ट्रान्सफर रिक्वेस्ट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मागील EPF खात्याचा तपशील (मागील युझर ID) प्रदान करा. तुम्हाला वर्तमान किंवा मागील कंपनी किंवा संस्थेकडून पडताळणीसाठी हस्तांतरण अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
आवश्यक ठिकाणी तुमचा यूजर आयडी किंवा यूएएन द्या. आपण 'MID' पर्यायावर क्लिक करून आपला एमआयडी देखील जनरेट करू शकता. तुमचा MID प्रविष्ट केल्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवण्यासाठी 'Get OTP' बटणावर क्लिक करा.
एकदा ओटीपी मिळाल्यानंतर, तो एन्टर करा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा. तुमच्या ऑनलाइन पीएफ हस्तांतरणाच्या अर्जाची सेल्फ अटेस्टेड कॉपी पीडीएफ फाइलमध्ये निवडलेल्या कंपनीला किंवा संस्थेला ऑनलाइन अर्ज सादर केल्याच्या 10 दिवसांच्या आत सबमिट करा.
कंपनी किंवा संस्था डिजिटल रूपानं PF ट्रान्सफर रिक्वेस्ट अप्रुव्ह करतात. मंजुरीनंतर, पीएफ सध्याच्या कंपनीकडे असलेल्या नवीन खात्यात हस्तांतरित केला जातो. त्यानंतर एक ट्रॅकिंग आयडीदेखील जनरेट होतो. त्याचा उपयोग ऑनलाइन अर्ज ट्रॅक करण्यासाठीही केला जाऊ शकतो.
कर्मचाऱ्यांना ट्रान्सफर क्लेम फॉर्म (Form 13) डाऊनलोड करावा लागतो. काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांना EPF ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपनीला हा फॉर्म जमा करणं आवश्यक असतं.
जर तुम्ही पीएफमधून पैसे ट्रान्सफर करू इच्छित असाल तर सर्वप्रथम खातेधारकाकडील युनिव्हर्सल अकाऊंट नंबर अॅक्टिव्हेट करावा लागतो. याशिवाय खातेधारकाचा बँक खाते क्रमांक आणि अन्य डिटेल योग्यरित्या देणं आवश्यक आहे.