PPF मधून रेग्युलर इन्कमचा जुगाड मोठे एक्सपर्टही सांगू शकणार नाहीत, पाहा महिन्याला कशी करू शकता ₹६०,००० ची कमाई

By जयदीप दाभोळकर | Updated: March 10, 2025 09:30 IST2025-03-10T09:21:30+5:302025-03-10T09:30:05+5:30

जर तुम्ही सुरक्षित आणि खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग शोधत असाल तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) देखील तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यात गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतर दरमहा ६०,००० रुपयांच्या नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता.

जर तुम्ही सुरक्षित आणि खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग शोधत असाल तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) देखील तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यात गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतर दरमहा ६०,००० रुपयांच्या नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. ही अशी पद्धत आहे जी मोठ मोठे तज्ज्ञही तुम्हाला सांगू शकणार नाहीत. हे कसं काम करेल जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

पीपीएफमध्ये तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त १.५ रुपये जमा करू शकता. सध्या या योजनेवर ७.१ टक्के व्याज मिळत असून हे व्याज कंपाउंडिंग तत्त्वावर वाढतं. पीपीएफचा मॅच्युरिटी पीरियड १५ वर्षांचा आहे, पण तुम्हाला ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोनदा तो वाढवावा लागेल आणि गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल. म्हणजेच यात तुम्हाला २५ वर्षे १.५ लाख रुपयांची गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल.

पीपीएफमध्ये २५ वर्षे सलग १.५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंतवणूक ३७,५०,००० रुपये होईल आणि तुम्हाला ७.१ टक्के दरानं ६५,५८,०१५ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुमच्या पीपीएफ खात्यात एकूण १,०३,०८,०१५ रुपये जमा होतील.

२५ वर्षांनंतरही तुम्हाला खात्यातून हे पैसे काढावे लागणार नाहीत. तुम्ही असं केल्यास, तुमच्या PPF खात्यात जी काही रक्कम जमा असते, त्यावर तुम्हाला PPF च्या हिशोबानुसार व्याज मिळत राहते. अशा परिस्थितीत तुम्ही या खात्यातून संपूर्ण पैसे कधीही काढू शकता किंवा वर्षातून एकदा काढू शकता.

जर तुम्ही संपूर्ण १,०३,०८,०१५ रुपये खात्यात तसेच ठेवले तर ७.१% दरानं व्याजातून ७,३१,८६९ रुपये मिळतील. व्याजाची रक्कम तुम्ही वार्षिकच काढू शकता. १२ महिन्यांनुसार ७,३१,८६९ रुपयांची विभागणी केल्यास ती ६०,९८९ रुपये होतील. अशा प्रकारे तुम्ही दरमहा ६०,९८९ रुपयांची व्यवस्था करू शकता. तसंच तुमच्या खात्यात १,०३,०८,०१५ रुपयांचा निधीही शिल्लक राहणार आहे.

पीपीएफ खातं योगदानासह ५-५ वर्षांच्या ब्लॉकपर्यंत वाढविण्यासाठी, आपल्याला खातं कुठेही असल्यास बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सादर करावा लागेल. मॅच्युरिटीच्या तारखेपासून १ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आपल्याला हा अर्ज सादर करावा लागेल. पीपीएफ खात्यात २५ वर्षे योगदान देत राहण्यासाठी हे लक्षात ठेवा.