सबकी पसंद 'निरमा'... प्रसिद्ध वॉशिंग पॉवडर कंपनीच्या शेअर्सची आजची किंमत By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 10:40 AM 2023-03-11T10:40:30+5:30 2023-03-11T10:54:51+5:30
दूरदर्शनचा काळ आणि जाहिरातींचा भडीमार सुरू होता, त्याच काळात एका जाहिरातीने देशातील प्रत्येकाच्या घरातघरात आपलं स्थान निश्चित केलं. विशेष म्हणजे या जाहिरातीनंतर निरमा वॉशिंग पावडरही घराघरात पोहोचली. दूरदर्शनचा काळ आणि जाहिरातींचा भडीमार सुरू होता, त्याच काळात एका जाहिरातीने देशातील प्रत्येकाच्या घरातघरात आपलं स्थान निश्चित केलं. विशेष म्हणजे या जाहिरातीनंतर निरमा वॉशिंग पावडरही घराघरात पोहोचली.
देशभरात एकेकाळी 10 घरांपैकी 6 घरांमध्ये निरमा वॉशिंग पावडर वापरली जात असे. तीच वॉशिंग पावडर आता घराघरांतून आऊटडेटड झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
कारण करसन भाई पटेल यांच्या यशाचं शिखर कोणेएकेकाळी अवकाशापर्यंत पोहोचलं होतं. मात्र, सध्याच्या स्पर्धेच्या युगात निरमा वॉशिंग पावडर मागे पडताना दिसत आहे.
शेअर मार्केटमध्ये कंपनीचे मुल्यांकन कमी असून कंपनीच्या उत्पादनाचा विस्तारही ६० टक्क्यांहून ६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. कंपनीच्या एनएसई मार्केटमधील शेअर्सची आजची किंमत २५५ रुपये इतकी आहे.
एका सायकलवरुन सुरु केलेली उत्पादन विक्रीने थेट १७ हजार कोटीपर्यंतचा पल्ला गाठला होता. देशभरात एफएमसीजी कंपन्यांनीही ज्यांनी टक्कर दिली तीच कंपनी आज स्पर्धेत मागे पडलीय.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात शेतकरी कुटुंबातील करसन भाई पटेल यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अहमदाबादमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम केलं.
परंतु लवकरच त्यांना गुजरात सरकारच्या खनिकर्म आणि भूविज्ञान विभागात सरकारी नोकरी मिळाली. सरकारी नोकरी असूनही करसनभाईंना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती.
करसन भाई निरमाच्या नावाने उत्पादनं बनवू लागले. पण बाजारात असलेल्या HUL सारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण होते. त्यासाठी त्यांनी नवनवीन रणनीती अवलंबली.
प्रत्येक पॅकेटवर लिहायला सुरुवात केली – कपडे स्वच्छ नसल्यास पैसे परत.. लोकांनी हे पसंत पडू लागलं आणि लोकांकडून खरेदी सुरु झाली आणि दर्जेदार उत्पादनाने आत्मविश्वास निर्माण केला.
लवकरच त्यांच्या उत्पादनाची मागणी वाढू लागली. व्यवसायात झालेली वाढ पाहून करसनभाईंनी सरकारी नोकरी सोडून बाजाराकडे पूर्ण लक्ष द्यायला सुरुवात केली.