धनत्रयोदशी-लक्ष्मीपूजन होताच सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 03:37 PM2023-11-13T15:37:48+5:302023-11-13T15:48:06+5:30

तज्ज्ञांच्या मते, हमास आणि इस्रायल युद्धामुळे सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे. यात सोन्याचा दर वाढण्याची दाट शक्यता आहे.

धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन होताच सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सराफा बाजारात सोने 60000, तर चांदीही 70000 च्या खाली आली आहे. आज सोने 322 रुपयांनी, तर चांदी 1016 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सोमवारी 13 डिसेंबररोजी 24 कॅरेट सोने 322 रुपयांनी स्वस्त होऊन 59945 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुले झाले आहे. तर चांदी 1016 रुपये प्रति किलोने घसरून 69400 रुपये प्रति किलोवर खुली खुली झाली.

याच बरोबर, सोने ऑल टाइम हाय 61739 रुपयांपेक्षा 1821 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर, चांदी 5 मेच्या किंमतीच्या तुलनेत जवळपास 8000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

आजच्या किंमती इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशनने (IBJA) जारी केल्या आहेत. सोन्या-चांदीच्या या दरात जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे आपल्या शहरात सोन्या-चांदीचा दर 1000 ते 2000 रुपयांनी अधिकही असू शकतो.

आयबीजेएनुसार, 23 कॅरेट गोल्ड आज 59678 रुपयांवर खुले झाले. यावर 1790 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा जीएसटी लागेल. जीएसटीसह याची किंमत 61468 रुपयांवर जाईल.

22 कॅरेट सोन्याचा दर 54885 रुपये एवढा आहे. तीन टक्के जीएसटीच्या हिशेबाने अर्थात 1646 रुपयांसह हा दर 56531 रुपयांवर पोहोचेल. तर, 18 कॅरेट सोन्याचा दर 44939 रुपयांवर आला आहे. यावर 1348 रुपये एवढा जीएसटी लागून ते 46287 रुपयांवप पोहोचेल.

'24 कॅरेट गोल्ड असते सर्वात शुद्ध - खरे तर 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. शुद्ध सोने अथवा 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्धत असते. त्यात इतर कुठलाही धातू मिसळलेला नसतो. सोन्याची नाणी आणि बार तयार करण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर होतो. सोन्याची शुद्धता ही 24 कॅरेटच्या तुलनेत मोजली जाते.

लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट - जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.

कशी असेल पुढची स्थिती - तज्ज्ञांच्या मते, हमास आणि इस्रायल युद्धामुळे सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे. यात सोन्याचा दर वाढण्याची दाट शक्यता आहे. जर हे युद्ध पुढेही सुरूच राहीले तर हे दर आणखी वाढतील. मात्र, हे युद्ध थांबल्यास सोन्याचा दर आणखी खाली येईल.