डबा भरा अन् निघा कामाला, 'या' मोठ्या कंपन्यांकडून 'वर्क फ्रॉम होम' बंद By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 10:54 AM 2021-10-04T10:54:42+5:30 2021-10-04T11:00:35+5:30
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही कमी असल्याने आता आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवायला सुरूवात केली आहे. त्यानुसार, काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंदची घोषणाही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्च 2020 रोजी देशात लॉकडाऊन जाहीर केला. तेव्हापासून आजतागायत आयटी कंपन्यांसह अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला.
जवळपास गेल्या 1.5 वर्षांपासून या सर्वांचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने आता कर्मचाऱ्यांनाही या कामाची सवय झाली आहे. पण, आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून लसीकरणही वेगात होत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही कमी असल्याने आता आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवायला सुरूवात केली आहे. त्यानुसार, काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंदची घोषणाही केली आहे.
काही कंपन्यांनी काही कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल्स आणेल आहेत. त्यानुसार, काही प्रमाणात कर्मचाऱ्यांना कंपनीत बोलवून काहींना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात येतो. याच कंपन्यांची यादी जाणून घेऊया.
TCS कंपनीनं सर्वात आधी वर्क फ्रॉम होम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 500,000 जास्त कर्मचारी असलेल्या या कंपनीनं तब्बल 70-80 टक्के कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 2022 च्या सुरुवातीपर्यंत हे कर्मचारी परत ऑफिसला येण्याची शक्यता आहे.
TCS ने 25-25 मॉडेलची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आहे. यानुसार 5% कर्मचारी घरून काम करतील आणि उर्वरित 2025 पासून पूर्णपणे घरून काम करतील.
विप्रो आणि इन्फोसिस सारख्या आयटी कंपन्यांनी ऑफिस प्लॅनबाबत आपला हेतू स्पष्ट केला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, विप्रोचे चेअरमन रिशाद प्रेमजी यांनी ट्वीट केलं आहे की फर्म आपल्या कार्यालयांमध्ये कोरोनाव्हायरस प्रोटोकॉल कसे लागू करत आहे. त्यामुळे या कंपन्याही वर्क फ्रॉम होम बंद करण्याच्या मार्गावर आहेत.
IT क्षेत्रातील दिग्गजांव्यतिरिक्त, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि येस बँक या वित्तीय गटांनी त्याचं वर्क फ्रॉम होम संपूर्णपणे बंद करण्याचे संकेत दिले आहेत.
अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात परत येण्यास सांगण्याचा विचार करत आहेत. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्याचा पर्याय त्यांच्यावरच सोडत आहेत.