Fixed Deposit : बँकेत FD आहे, मग ही चूक पडू शकते महागात, येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 10:09 AM 2021-04-10T10:09:54+5:30 2021-04-10T10:14:08+5:30
Fixed Deposit News : गेल्या काही महिन्यांपासून करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून धडाधड नोटिसा मिळत आहे. कर भरणाऱ्या लोकांना प्राप्तिकर विभागाकडून मेसेज आणि ई-मेलच्या माध्यमातून नोटिसा मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून धडाधड नोटिसा मिळत आहे. कर भरणाऱ्या लोकांना प्राप्तिकर विभागाकडून मेसेज आणि ई-मेलच्या माध्यमातून नोटिसा मिळत आहेत.
प्राप्तिकर विभागाकडे करदात्यांना व्याजाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमाईची जी माहिती आहे ती माहिती करदात्यांकडून देण्यात आलेल्या इन्कम टॅक्स रिटर्नशी (आयटीआर) मिळती जुळती नसल्याने प्राप्तिकर विभागाकडून या नोटिसा पाठवण्यात येत आहेत.
बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवी (फिक्स डिपॉझिट) वर मिळणारे व्याज हे पूर्णपणे करपात्र असते. मात्र आयटीआर भरताना करदाते याचे विवरण नमूद करणे विसरून जातात. आयटीआरमध्ये त्याची नोंद होत नाही. या किरकोळ वाटणाऱ्या चुकीमुळे प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांना नोटिस पाठवली जात आहे.
जर प्राप्तिकर विभागाकडून येणाऱ्या अशा नोटिशीपासून वाचायचे असेल तर बँक एफडीवर मिळणाऱ्या व्याजाची माहिती प्राप्तिकर खात्याला देणे आवश्यक आहे. व्याजातून होणाऱ्या कमाईची माहिती देण्यासाठी आयटीआरमध्ये दोन पर्याय आहेत. करदाते आपल्या इंट्रेस्ट इन्कमला आयटीआरमध्ये ईयर ऑफ अॅक्रुअल सोबर ईयर ऑफ रिसिप्टमध्ये दाखवू शकतात.
म्हणजेच तुम्ही व्याजाचे विवरण दर वर्षाच्या हिशोबाने देऊ शकता किंवा त्या वर्षीसुद्धा देऊ शकता जेव्हा तुम्हाला एफडीचे रिटर्न मिळतीस. मात्र कर तज्ज्ञांच्या मते एफडीवर मिळणारे व्याज हे ईअर ऑफ अॅक्रुअलमध्येच दाखवावे.
दरवर्षीच्या व्याजामधून बँका टीडीएस कापून घेत असतात. ते तुम्ही आयटीआर फॉर्म २६AS मध्ये दाखवू शकता. त्यामुळे टीडीएस आणि अॅन्युअल इंट्रेस्टच्या आकड्यांमध्ये काही फरक नसेल. तसेच टॅक्स डिपार्टमेंटच्या नियमांचेही उल्लंघनही होणार नाही. जर तुम्ही तुमचे उत्पन्न एग्झम्टेड लिमिटपेक्षा कमी असे तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस पेमेंट करावे लागणार नाही. बँका या व्याजावर १० टक्के दराने टीडीएस कापत असतात.