Fixed Vs Floating Interest Rate: तुमच्यासाठी कोणतं लोन उत्तम? निर्णयापूर्वी जाणून घ्या नफा-नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 04:45 PM2022-09-14T16:45:18+5:302022-09-14T16:54:46+5:30

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँका आणि हाऊसिंग फायनॅन्स कंपन्याही हळूहळू त्यांचे व्याजदर वाढवत आहेत.

Fixed Vs Floating Interest Rate: छोटं किंवा मोठं असो पण आपलं घर असावे असे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. तो पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. कठोर परिश्रमाने, तो बँक किंवा गृहनिर्माण वित्त कंपनीकडून कर्ज घेतो, जेणेकरून त्याला घराचे स्वप्न पूर्ण करता येईल.

घर खरेदीसाठी दिलेल्या कर्जाला गृहकर्ज म्हणतात. यामध्ये बँकांकडून घराच्या हमीपोटी कर्ज दिले जाते. या कर्जासाठी साधारणपणे दोन प्रकारच्या व्याज पद्धतींचा अवलंब केला जातो. यामध्ये, पहिला म्हणजे फिक्स्ड इंटरेस्ट आणि दुसरा म्हणजे फ्लोटिंग इंटरेस्ट रेट.

फिक्स्ड इंटरेस्ट रेटमध्ये गृहकर्ज घेताना निश्चित केलेल्या व्याजदरानुसार कर्जावर व्याज दिले जाते, तर फ्लोटिंग व्याजदरामध्ये सरकार, आरबीआय आणि बाजारानुसार व्याजदर वाढत किंवा कमी होत राहतो. सामान्यत: लोक गृहकर्जामध्ये फ्लोटिंग व्याजदराचा पर्याय निवडणे पसंत करतात. कारण सरकार, आरबीआय यांनी वेळोवेळी दिलेल्या सवलतींमुळे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी होतो. गेल्या 4 वर्षात गृहकर्जावरील व्याजदर खूपच कमी होता.

आरबीआयने नुकत्याच केलेल्या रेपो दरात वाढ केल्यानंतर बँका आणि हाऊसिंग फायनॅन्स कंपन्याही हळूहळू त्यांचे व्याजदर वाढवत आहेत. जे गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी अडचणीचे मोठे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत अनेक लोक फिक्स्ड इंटरेस्ट होम लोनवर स्विच करण्याचा विचार करत आहेत. कारण निश्चित व्याजदर मोडमध्ये व्याजदरातील अनिश्चितता टाळता येते.

फिक्स्ड होम लोनमुळे तुम्हाला तुमचे बजेट आणि आर्थिक गुंतवणुकीच्या योजना बनविण्यास मदत मिळते. फिक्स्ड लोन रेटची किंमत फ्लोटिंगपेक्षा थोडी जास्तच असते. फ्लोटिंग रेट हा बाजारातील व्याजदरानुसार बदलत राहतो. जर बेंचमार्क रेटमध्ये वाढ झाली तर व्याजही वाढते. सहाजिकच हप्ताही वाढतो.

जर तुमचा ईएमआय पगाराच्या 25 ते 30 टक्क्यापर्यंतच असेल. भविष्यात व्याजदर वाढण्याचा अंदाज असेल आणि होम लोन सध्याच्या व्याजदरावर लॉक करू इच्छित असाल तर. नजिकच्या काळात व्याजदर कमी झाले असतील आणि सध्याचे व्याजदर तुम्हाला परवडणारे असतील तर फिक्स्ड रेटचा फायदा होईल.

जर तुम्ही काळाबरोबर व्याज दर कमी होण्याची आशा करत असाल तर हा रेट फायद्याचा ठरू शकतो. जर व्याजदर कमी-जास्त झाले तर त्याचा परिणाम तुम्हाला जाणवत नसेल तरच हा पर्याय निवडावा. जर तुम्हाला नजिकच्या काळात वाचलेल्या व्याजातून काही बचत करायची आहे तर फ्लोटिंग रेट निवडावा. जो फिक्स रेटपेक्षा कमी आहे.

टॅग्स :बँकbank