Multibagger Share विसरा, या Mutual Fund नं केलं कोट्यधीश; १० हजारांचे झाले १२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 10:23 AM2023-01-12T10:23:00+5:302023-01-12T10:29:29+5:30

आज आपण अशा एसआयपीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यानं काही वर्षांच्या कालावधीत अवघ्या १० हजारांच्या गुंतवणूकीला १२ कोटी रुपये बनवलं आहे.

जर तुम्हाला बाजारातील गुंतवणूकीतून मोठा परतावा हवा असेल तर काही काळ गुंतवणूक तशीच ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही बहुधा मल्टीबॅगर शेअर्सबद्दल ऐकले असेल की या शेअरने काही वर्षांत 10 पट परतावा दिला आहे किंवा 10,000 रुपयांच्या गुंतवणूकीचं मूल्य 10 लाख रुपये केले आहे.

येथे आम्ही तुम्हाला कोणत्याही मल्टीबॅगर शेअरबद्दल सांगत नाही, तर आम्ही तुम्हाला अशा एसआयपीबद्दल सांगत आहोत ज्याने काही वर्षांत 10,000 हजारांची गुंतवणूक तब्बल 12 कोटी रुपये केली आहे. या म्युच्युअल फंडाने काही वर्षांत अनेक पटींनी परतावा दिलाय.

HDFC फ्लेक्सी कॅप फंड हा एक ओपन-एंडेड डायनॅमिक इक्विटी फंड आहे जो मोठ्या, मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. या फंडाच्या माध्यमातून इक्विटी आणि इक्विटी संबंधित इन्स्ट्रूमेंट्समध्ये गुंतवणूक केली जाते. हा म्युच्युअल फंड वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

HDFC फ्लेक्सी कॅप फंड प्लॅन 1 जानेवारी 1995 रोजी लाँच करण्यात आला. या फंडाने 2023 मध्ये 28 वर्षे पूर्ण केली आहेत. HDFC फ्लेक्सी कॅप फंडाने 21 टक्क्यांच्या CAGR सह 10,000 रुपयांची गुंतवणूक 12 कोटी रुपयांमध्ये कशी बदलली ते पाहू.

महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक म्हणजेच वार्षिक 1.20 लाख रुपयांची गुंतवणूकीचं मूल्य गेल्या वर्षी 1.39 लाख रुपये झाले. या कालावधीत या फंडाने 30.29 टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला होता. या फंडाने गेल्या 3 वर्षात 31.03 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तर 5 वर्षात 20.82 टक्के वार्षिक परतावा दिलाय.

10,000 रुपयांची मासिक SIP तुमच्या एकूण 6 लाख रुपयांच्या गुंतवणूकीचं मूल्य 10.07 लाख रुपये इतके करते. फंडाने गेल्या 10 वर्षांत 16.11 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. त्यानुसार तुमची 12 लाख रुपयांच्या गुंतवणूकीचं मूल्य वाढून 27.92 लाख रुपये झाले आहे.

10,000 रुपयांच्या मासिक SIP सह, तुमची 18 लाख रुपयांची गुंतवणूक गेल्या 15 वर्षांत 15.32 टक्क्यांच्या वार्षिक परताव्याच्या विचारात वाढून 63.38 लाख रुपये झाली असती. फंडाच्या सुरुवातीपासून 21.00 टक्क्यांच्या CAGR सह महिन्याला 10,000 रुपयांची SIP तुमच्या एकूण 33.50 लाख रुपयांचे मूल्य 12.94 कोटी रुपयांमध्ये करू शकते. 31 डिसेंबर 2022 पर्यंत HDFC फ्लेक्सी कॅप फंड-ग्रोथचे एकूण असेट्स 32,894 कोटी रुपये आहे. (टीप - या लेखात केवळ म्युच्युअल फंडाच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)