फ्री OTT, झोमॅटो गोल्ड.., Jioच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त मुकेश अंबानींची ग्राहकांना भेट, पाहा डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 08:43 AM 2024-09-06T08:43:16+5:30 2024-09-06T08:54:43+5:30
Reliance Jio Anniversary : ८ वर्षांपूर्वी रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री केली होती. त्यानंतर अनेक टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले होते. मोफत कॉलिंग, मोफत इंटरनेट अशा अनेक सुविधा रिलायन्स जिओनं दिल्या होत्या. Reliance Jio Anniversary : ८ वर्षांपूर्वी रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री केली होती. त्यानंतर अनेक टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले होते. मोफत कॉलिंग, मोफत इंटरनेट अशा अनेक सुविधा रिलायन्स जिओनं दिल्या होत्या. यामध्ये काही कंपन्यांना आपला गाशाही गुंडाळावा लागला होता.
दरम्यान, आता आपल्या ८ व्या वर्धापनदिनानिमित्त रिलायन्स जिओनं अनेक ऑफर्स आणल्या आहेत. कंपनी आपल्या ८ व्या वर्धापनदिनानिमित्त युझर्सना झोमॅटो गोल्ड आणि ओटीटी सब्सक्रिप्शनसारखे फायदे देत आहे. यासाठी तुम्हाला तुमचा फोन रिचार्ज करावा लागेल.
मोबाइल रिचार्ज प्लॅनसोबत कंपनी ग्राहकांना हे बेनिफिट्स देत आहे. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे ८९९ रुपये आणि ९९९ रुपयांच्या तिमाही रिचार्ज प्लॅन आणि ३५९९ रुपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनचा पर्याय असेल. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, जिओ अॅनिव्हर्सरी ऑफरसोबत युजर्संना ७०० रुपयांपर्यंतचे फायदे मिळणार आहेत.
या ऑफरमध्ये १७५ रुपयांच्या किंमतीचे १० ओटीटी अॅप्स मेंबरशीपसह १० जीबी डेटा पॅक मिळेल. याची वैधता २८ दिवसांची असेल. तसंच झोमॅटोची ३ महिन्यांची गोल्ड मेंबरशिपही मोफत दिली जाणार आहे. २९९९ रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या खरेदीवर ५०० रुपयांचं AJIO व्हाउचर देखील मिळणार आहे.
देशात बसविण्यात आलेल्या सर्व ५जी बीटीएस (Base transceiver station) पैकी ८५% पेक्षा जास्त जिओचे आहेत. जिओ लाँच होऊन ८ वर्षे झाली आहेत. या ८ वर्षात जिओ वायरलेस आणि वायरलाइन या दोन्ही क्षेत्रात मार्केट लीडर बनली आहे.
आज जिओचे ४९ कोटींहून अधिक ग्राहक आहेत, ज्यात १३ कोटी ५जी ग्राहकांचा समावेश आहे. जिओनं जगातील सर्वात मोठं आणि वेगवान स्टँड-अलोन ५जी नेटवर्क सुरू केलं आहे.
जिओच्या या ऑफरचा लाभ एका ठराविक वेळेपर्यंतच घेता येणार आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ५ ते १० सप्टेंबरदरम्यान रिचार्ज करावं लागेल. जगातील ८ टक्के मोबाइल डेटा ट्रॅफिक जिओ नेटवर्कवर चालतो. जिओ युझर्स १४८.५ अब्ज जीबी डेटा वापरतात, जे देशाच्या एकूण डेटा वापराच्या ६० टक्के आहे. जिओमुळे डेटा वापराच्या बाबतीत भारत १५५ व्या स्थानावरून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.