Credit Card : विमान प्रवास करताय? Free Airport Lounges साठी 'ही' क्रेडिट कार्ड ठरतील बेस्ट, मिळतील Premium फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 02:15 PM 2022-11-21T14:15:11+5:30 2022-11-21T14:32:11+5:30
Credit Card for Free Airport Lounges Access : क्रेडिट कार्ड हे एक सोयीस्कर प्रोडक्ट आगे, जे जगभरातील लोक मोठ्या प्रमाणावर वापरतात. याचा वापर अनेक गोष्टींच्या खरेदीसाठी केला जातो. Credit Card for Free Airport Lounges Access : क्रेडिट कार्ड केवळ वस्तू किंवा सेवांच्या खरेदीवर पैसे भरण्यासाठी उपयुक्त नाहीत, तर क्रेडिट कार्डचे इतरही अनेक फायदे आहेत. याच्या मदतीने अनेक गोष्टी कमी खर्चात किंवा अगदी मोफत मिळवता येतात.
क्रेडिट कार्ड हे एक सोयीस्कर आर्थिक उत्पादन आहे, जे जगभरातील लोक मोठ्या प्रमाणावर वापरतात. याचा वापर दैनंदिन खरेदीसाठी तसेच मोठ्या किमतीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी केला जातो. सोयीशिवाय, क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत.
क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला तर क्रेडिट कार्ड ही खूप उपयुक्त गोष्ट आहे. क्रेडिट कार्ड रिवॉर्ड मिळवणे, प्रवास करणे, आपात्कालिन स्थितीत मद, सिबिल सुधारण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर फ्री एअरपोर्ट लाउंजचा लाभही क्रेडिट कार्डद्वारे घेता येईल. तथापि, प्रत्येक क्रेडिट कार्डमध्ये ही सुविधा मिळत नाही.
प्रीमियम क्रेडिट कार्ड अतिरिक्त लाभ आणि फायद्यांसह येतात. जरी हे क्रेडिट कार्ड सामान्य क्रेडिट कार्डांपेक्षा जास्त शुल्क आकारत असतील, तरी ते बरेच फायदे देखील करून देतात. तुमच्याकडे प्रीमियम क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्हाला एअरपोर्ट लाउंज ऍक्सेस, कॉन्सिअर्ज सर्व्हिसेस, कॉम्प्लिमेंटरी गोल्फ प्रोग्राम, इन्शुरन्स इत्यादी प्रीमियम सेवांचा लाभ मिळेल.
एचडीएफसी बँक इन्फिनिया क्रेडिट कार्ड मेटल एडिशन, एसबीआय ऑरमम क्रेडिट कार्ड, ॲक्सिस रिझर्व्ह क्रेडिट कार्ड, एचडीएफसी डिनर्स क्लब ब्लॅक क्रेडिट कार्ड, इंडसइंड बँक लेजेंड क्रेडिट कार्ड, सिटी प्रेस्टिज क्रेडिट कार्ड, स्टँडर्ड चार्टर्ड प्रायोरिटी व्हिसा इन्फिनिटी क्रेडिट कार्ड अशा प्रीमिअम कार्डासह तुम्हाला मोफत एअरपोर्ट लाऊंजचा ॲक्सेस मिळू शकतो.
याशिवाय Cashback SBI Card 999 रुपयांच्या वार्षिक शुल्कसह येते आणि तुम्हाला भारतात दरवर्षी 4 एअरपोर्ट लाउंजमध्ये (तिमाहीत एकदा) कॉम्प्लिमेंट्री ॲक्सेस दिला जातो.
Flipkart Axis Bank Credit Card च्या ग्राहकांना वर्षभरात 4 मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजमध्ये अॅक्सेस मिळतो. या कार्डचे वार्षिक शुल्क 500 रुपये आहे. Axis Bank Ace क्रेडिट कार्ड 999 रुपये वार्षिक शुल्कासह येते. कार्डधारकाला दरवर्षी 4 मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजमध्ये अॅक्सेस मिळतो.
HDFC Bank Millennia Credit Card 1000 रुपयांच्या वार्षिक शुल्कासह येते. या कार्डद्वारे, तुम्ही वर्षातून 8 वेळा देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये अॅक्सेस करू शकता. एका तिमाहीत जास्तीत जास्त 2 वेळा देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये अॅक्सेस करू शकतो.
ICICI Coral RuPay Credit Card 500 रुपयांच्या वार्षिक शुल्कासह येते. कार्डधारक एका तिमाहीत एकदा देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये अॅक्सेस करू शकतात.