WhatsApp वरून एक मेसेज करून सेकंदात बुक करा Gas Cylinder; पाहा नंबर आणि प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 10:56 AM2021-04-15T10:56:45+5:302021-04-15T11:04:58+5:30

Gas Cylinder Booking : भारत गॅस, एचपी आणि इंडेन या कंपन्या WhatsApp वरून गॅस बुक करण्याची देत आहेत सुविधा.

गॅस सिलिंडर बुक करायचा असेल तर अनेक जण एकतर फोन करून किंवा आपल्या एजन्सीकडे जाऊन गॅस बुक करतात. परंतु आता या पद्धती काळाप्रमाणे जुन्या झाल्या आहेत.

आता तुमच्या स्मार्टफोनवरून आणि त्यातच विशेष म्हणजे तुमच्या WhatsApp क्रमांकावरून गॅस बुक करण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.

देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपन्या भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस या आपल्या ग्राहकांना WhatsApp द्वारे गॅस सिलिंडर बुक करण्याची सुविधा देत आहेत.

सेकंदात आपण व्हॉट्सअ‍ॅपवरुन गॅस बुकिंग कसे करू शकता आणि बुकिंगसाठी कोणत्या क्रमांकांचा वापर करता येतो ते पाहूया.

इंडेन गॅसचे ग्राहक 7588888824 नंबरवर बुकिंग करू शकतात. ग्राहकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये हा नंबर 7588888824 सेव्ह करावा.

यानंतर WhatsApp ओपन करा आणि तुमच्या रडिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून Book किंवा REFILL# असा मेसेज लिहून पाठवा.

REFILL# असं लिहून मेसेज पाठवल्यास ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. रिप्लायमध्ये बुकिंग केलेला गॅस सिलिंडर तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल याची माहिती असेल.

Bharat Gas च्या बुकिंगसाठी तुम्हाला 1800224344 हा नंबर सेव्ह करावा लागेल. नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला WhatsApp वर जावं लागेल.

त्यानंतर सेव्ह केलेल्या नंबरवर Hi किंवा Hello असा मेसेज पाठवा. त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून एक ऑटो रिप्लाय येतील.

जेव्हा तुम्हाला सिलिंडर बुक करायचा असेल तेव्हा केवळ त्यावर Book असं टाईप करून पाठवा. तो मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला ऑर्डर डिटेल आणि गॅस सिलिंडर कधी मिळेल याची माहिती मिळेल.

HP Gas च्या ग्राहकांसाठी 9222201122 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुमचं WhatsApp सुरू करा.

त्यानंतर सेव्ह केलेल्या क्रमांकावर Book असं लिहून मेसेज पाठवा.

मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्रमांकावर ऑर्डर डिटेल्स मिळतील. तसंच तुमचा गॅस सिलिंडर कधी डिलिव्हर होईल याची माहितीही मिळेल.

ग्राहकांच्या सुविधेसाठी गॅस कंपन्यांकडूनही सुविधा सुरू करण्यात आली आहे. एचपी, इंडेन आणि भारत गॅसचे ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

गॅस सिलिंडर बुक करताना तुम्हाला त्याच नंबरवरून मेसेज करावा लागेल जो एजन्सीडे रजिस्टर्ड आहे. कोणत्याही रजिस्टर नसलेल्या नंबरवरून बुकिंग करता येणार नाही.