१ ऑगस्टपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम; पाहा डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:25 AM 2024-07-31T11:25:58+5:30 2024-07-31T11:34:50+5:30
Rule Changes From 1 August: जुलै महिना आज संपणार असून उद्या म्हणजेच १ ऑगस्टपासून नवा महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक प्रकारच्या नियमांमध्ये बदल होत असतात. Rule Changes From 1 August: जुलै महिना आज संपणार असून उद्या म्हणजेच १ ऑगस्टपासून नवा महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक प्रकारच्या नियमांमध्ये बदल होत असतात. किंबहुना महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक सरकारी आणि वित्तीय संस्था आपल्या नियमांमध्ये बदल करतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो.
अशातच ऑगस्ट महिन्यात कोणते बदल होणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. १ ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींपासून गुगल मॅप सेवा आणि क्रेडिट कार्डपर्यंत अनेक नियम बदलणार आहेत. जाणून घेऊया या बद्दल सविस्तर माहिती.
LPG सिलिंडरचे दर - एलपीजी गॅस सिलिंडरचे दर दर महिन्याच्या १ तारखेला बदलले जातात. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यामुळे या महिन्यातही घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात आणखी कपात होण्याची अनेकांना अपेक्षा आहे.
क्रेडिट कार्डाचे नियम - एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांकडून आता थर्ड पार्टी पेमेंट अॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व रेंटल ट्रान्झॅक्शनच्या व्यवहारांवर एक टक्का रक्कम आकारली जाणार आहे. प्रत्येक व्यवहारासाठी कमाल मर्यादा तीन हजार रुपये असेल. पेटीएम, क्रेड, मोबिक्विक सारख्या थर्ड पार्टी पेमेंट अॅप्सचा वापर करून अनेकदा रेंटल ट्रान्झॅक्शन करण्यात येतात.
गूगल मॅपमध्ये बदल - १ ऑगस्टपासून गूगल मॅप्स इंडियामध्ये महत्त्वपूर्ण बदल करत आहे. अधिकाधिक सेवा पुरवठादारांना गूगल मॅप्स वापरता यावा, यासाठी पुढील महिन्यापासून कंपनी आपला सर्व्हिस चार्ज ७० टक्क्यांनी कमी करणार आहे. तसंच सेवा वापरणाऱ्या कंपन्यांकडून भारतीय रुपयात पेमेंट स्वीकारलं जाणार आहे. मात्र, सर्वसामान्य युजर्सना कोणतेही नवे शुल्क भरावं लागणार नाही.
फास्टॅगचे नियम - फास्टॅगचे नवे नियम १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. १ ऑगस्टपासून फास्टॅगची केवायसी बंधनकारक असेल. दरम्यान, फास्टॅगसाठी नवीन केवायसी आवश्यक आहे. १ ऑगस्टपासून कंपन्यांना एनपीसीआयच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. या नियमांमध्ये तीन ते पाच वर्षांपेक्षा जुन्या फास्टॅगसाठी केवायसी अपडेट करणं आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत पाच वर्षांपेक्षा जुन्या फास्टॅगमध्ये बदल करणं यांचा समावेश आहे.
सीएनजी-पीएनजी दर - देशभरात महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करण्याबरोबरच इंधन कंपन्या विमान इंधन आणि सीएनजी-पीएनजीच्या दरातही बदल करतात.
इन्कम टॅक्स - इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची ३१ जुलै २०२४ ही शेवटची तारीख आहे. ही तारीख चुकल्यास पुढील महिन्यापासून आयटीआर भरल्यास दंड भरावा लागू शकतो. वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत बिलेटेड रिटर्न भरू शकता.