gautam adani firm adani enterprises sets up a media company for this name media company
Adani आता मीडिया क्षेत्रात नशीब आजमावणार, ‘या’ 'नावे असणार गौतम अदानींची नवी न्यूज कंपनी By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 06:39 PM2022-04-28T18:39:38+5:302022-04-28T18:45:33+5:30Join usJoin usNext लवकरच ही कंपनी आपलं कामकाज सुरू करणार आहे. अदानी ग्रुपचा (Adani group) एक भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) ने एएमजी मीडिया नेटवर्कसह (AMG Media Network) मीडिया उद्योगात प्रवेश केला आहे. एईएलची सब्सिडायरी कंपनी लवकरच माध्यमांशी संबंधित आपलं कामकाज सुरू करणार आहे. माध्यमांशी संबंधित व्यवसाय करणं हेच एएमजी मीडिया नेटवर्कचं उद्देश आहे. यामध्ये प्रकाशन, प्रसारण, वितरण आणि अन्य सेमगेंट्सचा समावेश असे. गुरूवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात अदानी एन्टरप्राईजेसचे शेअर १.९७ टक्क्यांनी वाढून २३८० रुपयांवर बंद झाले. कंपनीनं २६ एप्रिल २०२२ रोजी एएमजी मीडिया नेटवर्क लिमिटेड नावानं एक पूर्ण स्वामित्व असलेल्या सब्सिडायरीची स्थापना केली आहे. या युनिटची स्थापना १ लाख रुपयांच्या प्रारंभिक अधिकृत आणि पेड अप भाग भांडवलासह करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलंय. कंपनीनं २६ एप्रिल २०२२ रोजी एएमजी मीडिया नेटवर्क लिमिटेड नावाच्या डब्ल्यूओएसला सामील केलं आहे. यात माध्यमांशी संबंधित व्यवसाय चालवण्यासाठी १ लाख रूपयांचे इनिशिअल ऑथराईज्ड आणि पेड अप शेअर भांडवलाचा समावेश आहे. यामध्ये पब्लिशिंग, एडवर्टायजमेंट, ब्रॉडकास्टिंगसह अन्य कामांचा समावेश असेल. यापूर्वी मार्च महिन्यानं अदानीनं क्विंट डिजिटलची इनडायरेक्ट सहाय्यक कंपनी क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये भागीदारीची घोषणा केली होती.टॅग्स :अदानीशेअर बाजारAdanishare market