Gautam Adani : गौतम अदानी Auto Sector मध्येही नशीब आजमावणार; इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रात एन्ट्रीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 03:16 PM2022-01-21T15:16:36+5:302022-01-21T15:37:35+5:30

Gautam Adani Auto Sector Electric Vehicles : गौतम अदानी (Gautam Adani) आता ऑटो क्षेत्रातही जबरदस्त एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत.

Gautam Adani Auto Sector Electric Vehicles : गौतम अदानी (Gautam Adani) आता ऑटो क्षेत्रातही जबरदस्त एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. गौतम अदानी लवकरच इलेक्ट्रीक व्हेइकल सेगमेंटमध्ये (Electric Vehicle Segment) प्रवेश करू शकतात. जमीन आणि पाण्यावर चालणाऱ्या वाहनांसाठी एसबी अदानी ट्रस्टला (SB Adani Trust) ट्रेडमार्क (Trademark) मिळाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांचा हा उपक्रम व्यावसायिक इलेक्ट्रीक वाहनांच्या सेमगेंटमध्ये एन्ट्री घेण्याच्या विचारात आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. यामध्ये बस आणि ट्रक या दोन्हींचा समावेश असेल.

अदानी समूहाचा व्यवसाय अनेक क्षेत्रात पसरलेला आहे. सुरुवातीला, कंपनीचे इलेक्ट्रीक वाहन समूहाच्या स्वतःच्या वाहतुकीशी संबंधित कामासाठी वापरले जाईल. याशिवाय, ही कंपनी इलेक्ट्रीक वाहनांसाठी बॅटरीचं उत्पादन करेल आणि देशभरातील इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनचीही पायाभूत सुविधा तयार करेल.

इलेक्ट्रीक वाहनांबाबत सरकारही आता मोठी पावलं उचलत आहे. अलीकडेच, सरकारने जाहीर केले होते की ते देशभरात इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनचे जाळे विणण्यासाठी खाजगी संस्थांना सरकारी जमीन देण्यात येईल.

हा व्यवसाय रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलवर आधारित असेल. अहवालानुसार, कंपनी गुजरातमधील मुंद्रा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्सदेखील स्थापन करणार आहे.

इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रात, टाटा समूह (TATA Group) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) या देशातील दोन मोठ्या कॉर्पोरेट्स वेगानं आपले पाय पसरत आहेत.

शून्य कार्बन उत्सर्जनासाठी दोन्ही समुहांचा एक मेगा प्लॅनदेखील आहे. भारतात इलेक्ट्रीक वाहनांची बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. अदानी, अंबानी आणि टाटा समूह यांसारख्या कंपन्यांच्या प्रवेशामुळे ही बाजारपेठ चांगलीच स्पर्धात्मक बनली आहे.

व्यावसायिक इलेक्ट्रीक वाहन विभागात, टाटाचा Ace ब्रँड आणि अशोक लेलँडचा Dost ब्रँड अग्रेसर आहेत. दोन्हीच्या इलेक्ट्रीक मॉडेल्सची क्रेझ वाढत आहे. तसंच याच्या वापरामुळे होणारा वाहतूक खर्च खूपच कमी आहे. या वाहनांसाठी प्रति किलोमीटर किंमत सुमारे ८०पैसे ते १ रुपया आहे. तर डिझेल सेगमेंटसाठी ही किंमत सुमारे ४ रुपये प्रति लिटर असते.

अलीकडेच, रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) उपकंपनी असलेल्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलरने (Reliance New Energy Solar) १८१०० कोटी रुपयांच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय स्कीम) योजनेअंतर्गत अॅडव्हान्स केमिस्ट्री सेल (ACC) बॅटरीजच्या स्टोरेज प्रोग्रामसाठी निविदा सादर केल्या. या स्कीमसाठी १४० गिगाव्हॅट प्रति तास क्षमतेच्या एकूण १० निविदा मिळाल्या आहेत. हे वाटप करण्यात येणाऱ्या उत्पादन क्षमतेच्या दुप्पट आहे.