२४ तासांत Gautam Adani यांनी कमावले ४८ हजार कोटी, बिल गेट्स यांच्याइतकी झाली संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 05:55 PM2022-04-27T17:55:53+5:302022-04-27T18:12:56+5:30

अदानींच्या कंपनीनं केलंय गुंतवणूकदारांना मालामाल.

Gautam Adani Networth: वर्ष २०२२ मध्ये गौतम अदानी (Gautam adani) हे एकापेक्षा एक नवे रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे. यावर्षी गौतम अदानी हे आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले, तर दुसरीकडे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते चौथ्या स्थानी पोहोचले आहेत.

ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार आता गौतम अदानी यांची संपत्ती बिल गेट्स (Bill Gates) यांच्या इतकी झाली आहे. बिल गेट्स हेदेखील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानी आहेत. अदानी यांची संपत्ती १२५ बिलिअन डॉलर्स इतकी आहे. तर बिल गेट्स (Bill Gates networth) यांची संपत्तीदेखील १२५ बिलिअन डॉलर्स इतकी आहे.

ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये अदानी यांची संपत्ती ६.३१ बिलिअन डॉलर्सनं वाढली आहे. ही जगभरातील कोणत्याही अब्जाधिशांपेक्षा अधिक आहे. एका दिवसात त्यांच्या संपत्तीत ४८ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

यावर्षी जगभरात सर्वाधिक कमाई करणार्या अब्जाधिशांच्या यादीत गौतम अदानी (Gautam adani netwoth) पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची आतापर्यंतची कमाई ४८.३ बिलिअन डॉलर्स इतकी आहे.

गौतम अदानी यांच्या संपत्तीतील ही वाढ त्यांच्या शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समुळे आले आहेत. त्यांच्या कंपन्यांची शेअर बाजारातील कामगिरी उत्तम झाली आहे. अदानी समुहाच्या सर्व लिस्टेड कंपन्यांचं (Adani group listed firm) मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पुढे पोहोचलं आहे.

गौतम अदानी यांची अदानी विल्मर ही कंपनी फेब्रुवारीमध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. अदानी विल्मरमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली, त्यांची चारच महिन्यात चांदी झाली आहे. अदानी विल्मरने लिस्टिंग दिवसापासून जवळपास तीन पट रिटर्न दिले आहेत.

अदानी विल्मरच्या शेअर्सने बुधवारी सुरुवातीच्या सत्रात ८४२.९० रुपयांची पातळी गाठली होती. अदानी विल्मरचे शेअर्स ८ फेब्रुवारी रोजी २२१ रुपयांच्या डिस्काऊंटवर लिस्ट झाले होते.

सध्याच्या किंमतीनुसार, अदानी विल्मरच्या शेअर्सनी आतापर्यंत २८१.४ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. BSE वर कंपनीचे मार्केट कॅप १.७ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

जबरदस्त रिटर्न देण्यात दुसऱ्या क्रमांकावर अदानी पॉवर ही कंपनी आहे. कंपनीच्या शेअरनं २०२२ या वर्षांत १९८.०५ टक्त्यांचा रिटर्न दिला आहे. कंपनीचे शेअर ३१ डिसेंबर २०२१ रोजी बीएसईवर ९९.७५ रुपयांच्या स्तरावर होते.

बुधवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात या शेअरची किंमत ४.९९ टक्क्यांनी वाढून २९९.९० रुपयांवर बंद झाली. कंपनीच्या शेअरची ही ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी आहे. कंपनीचं मार्केट कॅप १.१४ लाख कोटी रुपये झालं आहे.

बुधवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात या शेअरची किंमत ४.९९ टक्क्यांनी वाढून २९९.९० रुपयांवर बंद झाली. कंपनीच्या शेअरची ही ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी आहे. कंपनीचं मार्केट कॅप १.१४ लाख कोटी रुपये झालं आहे.

अदानी विल्मर आणि अदानी पॉवर या कंपन्यांव्यतिरिक्त अदानी समुहाच्या जवळपास सर्वच कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येतेय. या कंपन्यांचं मार्केट कॅपही तेजीनं वाढत आहे.