Gautam Adani Son : राज्याच्या आर्थिक सल्लागार परिषदेत मोठी जबाबदारी, माहितीये काय करतात गौतम अदानींचे सुपुत्र ‘करण’?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 06:12 PM2023-02-06T18:12:48+5:302023-02-06T18:18:02+5:30

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक सल्लागार परिषदेची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये गौतम अदानी यांचे सुपुत्र करण अदानी यांनाही स्थान देण्यात आलंय.

भारताची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्यासाठी महाराष्ट्र राज्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलर बनवण्याचं उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं पाऊल उचललं आहे. त्यात सरकार आर्थिक सल्लागार परिषद ही स्वतंत्र संस्था निर्माण करून त्यात विविध उद्योगपतींना स्थान दिले आहे. यामध्ये गौतम अदानी यांचे सुपुत्र करण अदानी यांनाही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.  

गौतम अदानी यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी अनेक दशके लागली, परंतु एका अहवालामुळे त्यांची संपत्ती रातोरात कमी होऊ लागली आणि सध्या अदानी समूहाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

गौतम अदानी यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव करण आहे. अदानी समूह दीर्घकाळापासून बंदर व्यवसायात कार्यरत आहे. फक्त करण अदानी हा व्यवसाय हाताळतात. याशिवाय, अदानी समूहाने काही महिन्यांपूर्वीच सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला होता हे तुम्हाला माहीत असेलच. या नव्या व्यवसायातही करण अदानी यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. चला जाणून घेऊया ते सध्या काय करत आहेत?

अदानी समूहाने २०२२ मध्ये सिमेंट व्यवसायात प्रवेश केला आणि त्याची जबाबदारी मुलगा करणकडे सोपवली. अदानी समूहाने अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी लि. चा व्यवसाय विकत घेतला होता आणि हा करार पूर्ण झाल्यानंतर अदानी समूह ही देशातील दुसरी सर्वात मोठी सिमेंट उत्पादन कंपनी बनली होती.

अल्ट्राटेक ही कंपनी अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. गौतम अदानींनी करण अदानींना संचालक म्हणून आणि एसीसी लि. चेअरमन पदासाठी नामनिर्देशित केले होते. अदानी समूह अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. बंदरे, ऊर्जा ते विमानतळ आणि दूरसंचार अशी अनेक क्षेत्रात त्यांच्या कामाची व्याप्ती आहे.

एकेकाळी गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी, बिल गेट्स आणि वॉरन बफे यांना मागे टाकले होते, पण एक अहवाल आल्यानंतर शेअर बाजारात एक प्रकारे खळबळ उडाली. गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावरून थेट २१ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

गेल्या वर्षी या डीलमध्ये अदानी समूहाने अंबुजा सिमेंट्स खरेदी करून एसीसीमधील हिस्साही विकत घेतला होता. अंबुजामध्ये ६३.१५ टक्के आणि ACC मध्ये त्यांचा ५६.६९ टक्के हिस्सा आहे. अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी लि. भांडवलाबद्दल बोलायचे झाले तर ते सुमारे १९ अब्ज डॉलर्स आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या या समितीत सध्या देशभरात चर्चेत असलेल्या गौतम अदानी यांच्या सुपुत्राला स्थान देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या हिंडनबर्ग रिपोर्टमुळे गौतम अदानी यांच्या साम्राज्याला धक्का बसला आहे. अदानी समुहाचे शेअर्स कोसळले आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना कोट्यवधीचा फटका बसला असून शेअर मार्केटही बुडाले आहे. यात शिंदे-फडणवीस सरकारनं गौतम अदानी यांचे चिरंजीव करण अदानी यांची शासनाच्या आर्थिक सल्लागार परिषदेवर नियुक्ती केली आहे. 

दरम्यान, राज्य शासनाच्या या समितीत सध्या देशभरात चर्चेत असलेल्या गौतम अदानी यांच्या सुपुत्राला स्थान देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या हिंडनबर्ग रिपोर्टमुळे गौतम अदानी यांच्या साम्राज्याला धक्का बसला आहे. अदानी समुहाचे शेअर्स कोसळले आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना कोट्यवधीचा फटका बसला असून शेअर मार्केटही बुडाले आहे. यात शिंदे-फडणवीस सरकारनं गौतम अदानी यांचे चिरंजीव करण अदानी यांची शासनाच्या आर्थिक सल्लागार परिषदेवर नियुक्ती केली आहे. 

राज्य शासनाकडून परिषदेस करण्यात आलेला कोणताही आर्थिक अथवा अन्य धोरणात्मक मुद्दे, त्यावर राज्य शासनास सल्ला देणे, अर्थशास्त्रीदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर परामर्श करणे आणि त्यावरील भूमिका सादर करणे, सर्व क्षेत्रांमधील महत्त्वाच्या निर्देशकांचे मापदंड निश्चित करणे, १ लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्था वाढीसाठी धोरण निश्चित करणे, यासाठी आगामी ५ वर्षासाठीचा नियोजन आराखडा (5 Year Plan Document) राज्य शासनास सादर करणे अशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल.