एका अंगठीची किंमत एवढी, की आपण खरेदी करू शकाल बरीच घरं अन् 10-20 ऑडी-मर्सिडीज By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 12, 2020 05:20 PM2020-11-12T17:20:25+5:302020-11-12T17:34:36+5:30Join usJoin usNext हिऱ्याची अंगठी कुणाला घालावीशी वाटणार नाही? पण जर, एखाद्या अंगठीच्या किंमतीचा जागतिक विक्रम झाला, तर ती तुम्हालाही नक्कीच बघावीशी वाटेल. हो, जिनेव्हा येथे बुधवारी एक अंगठी तब्बल 20 कोटी रुपयांपेक्षाही अधिक किंमतीत विकली गेली. या लिलावातील फिंगर रिंगवर जडलेल्या एक दुर्मिळ जांभळट-लालसर रंगाच्या हिऱ्याने जागतिक विक्रम बनवला. कारण हा हिरा 2.77 मिलियन अमेरिकन डॉलर, अर्थात 20 कोटी (20,67,45,875.00) रुपयांना विकला गेला. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, हा 1.05 कॅरेटचा हिरा प्लॅटिनम आणि सोन्याच्या अंगठीत लावण्यात आला आहे. अत्यंत सुंदर रंगामुळेच या हिऱ्याला एवढी मोठी किंमत मिळाली आहे. ही फॅन्सी फिंगर रिंग टियारा जेम्स आणि ज्वैलरी डीएमसीसीने विकत घेतली होती. ती दुबईतील भारतीय तज्ज्ञ आशीष विजय जैन यांच्याकडे होती. आपल्या गुंतवणुकीसंदर्भात बोलताना आशीष विजय जैन यांनी सांगितले, की "दागिन्यांच्या उद्योगात वेगाने वाढ होत आहे. स्पर्धकही वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला ग्राहकांच्या भावनेप्रति संवेदनशील रहायला हवे. COVID-19 महामारीमध्ये, दुर्मिळ रत्नांना नेहमीच अधिक किंमत मिळते. ही एक गुंतवणूक आहे. सर्वसाधारणपणे हिऱ्यांचा रंग पांढरा असतो. यामुळेच लाल रंगाचा हिरा अत्यंत दुर्मिळ मानला जातो. यामुळेच हा हिरा अत्यंत महाग असतो. लाल रंगाचा हिरा नेमका कशामुळे तयार होतो, याचा शोध घेण्यासाठी, रत्नशास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन आणि मंथन करत आहेत. प्रदीर्घ संशोधनानंतर काहीलोक, अशा निष्कर्षावर पोहोचले आहेत, की लाल रंग हिऱ्याच्या स्ट्रक्चरमध्ये ग्लायडिंग अणूंच्या उपस्थितीमुळे तयार होतो. ही क्रिया होत असताना एक हिरा आपले अणू स्ट्रक्चर बदलतो. यामुळे हिऱ्याला एक विशिष्ट रंग प्राप्त होतो.