याला म्हणतात सुविधा देणं! आता व्हॉट्सॲपवरुन करा IPO चा अर्ज; ‘या’ कंपनीची खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:49 AM2022-03-03T11:49:21+5:302022-03-03T11:54:30+5:30

गेल्या अनेक महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांचे IPO एकामागून एक शेअर मार्केटमध्ये येऊन आदळत आहेत.

काही बहुचर्चित कंपन्यांच्या IPO नी गुंतवणूकदारांची प्रचंड निराशा केली असली तरी काही IPO नी दमदार, कमाल कामगिरी करत गुंतवणूकदारांना भरघोस रिटर्न देत मालामाल केले.

यातच आता देशातील अग्रगण्य गुंतवणूक सेवा कंपन्यांपैकी एक असलेल्या जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने गुंतवणूकदारांसाठी व्हॉट्सॲपवरून प्रारंभिक सार्वजनिक भागविक्री (IPO) मध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा आणली असल्याची घोषणा केली आहे.

जिओजित ग्राहकांसाठी IPO साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सर्वंकष पाठबळ आणि सहाय्य उपलब्ध करून देते. नेमकेपणाने सांगायचे झाल्यास, अर्ज प्रक्रियेदरम्यान जिओजितचे ग्राहक व्हॉट्सॲप चॅट विंडोद्वारे त्या समयी सुरू असणाऱ्या कोणत्याही आयपीओ प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

या सेवेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 'E-IPO' नावाचा अंतर्निहित केलेला (एम्बेडेड) पर्याय आहे जो गुंतवणूकदारांना आयपीओ अर्ज प्रक्रियेची प्रत्येक पायरी सुलभतेने आणि सुविधेने चढत जाण्याची मुभा देतो.

जिओजित टेक्नॉलॉजिजद्वारे विकसित केल्या गेलेल्या या सुविधेत, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना अनुकूल वैशिष्ट्ये, बाजार घडामोडींविषयक मौल्यवान बाजार अंतर्दृष्टी आणि सुरक्षाविषयक कडेकोट रूपरेषेसह समभागांमध्ये सोयीस्कर ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा अनुभव घेतो येतो.

जिओजितचे मुख्य डिजिटल अधिकारी जयदेव एम. वसंतम म्हणाले की, IPO सेवेचा शुभारंभ हा आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट डिजिटल-सक्षम गुंतवणूक सुविधा देण्याच्या आमच्या निरंतर सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

ही व्हॉट्सॲप-एकात्मिक आयपीओ सेवा आमच्या ग्राहकांचे बोट धरून त्यांना IPO अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या पायरीपर्यंत घेऊन जाते, सर्व गुंतवणूकदारांना उत्कृष्ट सुलभता आणि डिजिटल गुंतवणूक अनुभव देते.

याव्यतिरिक्त, IPO अर्ज सादर करण्याचे हे काम अगदी काही मिनिटांत व्हॉट्सॲप चॅट विंडो न सोडता पूर्ण केले जाऊ शकते. सरलेल्या २०२१ सालचा आयपीओचा धडाका २०२२ मध्येही सुरू राहण्याची अपेक्षा आहे, एलआयसीच्या आगामी विशालतम भागविक्रीमुळे प्राथमिक बाजारातील एकूणच लगबग वाढण्याची अपेक्षा आहे.