१ वर्षात १८ टक्के रिटर्न मिळवा! तुम्ही केली का गुंतवणूक? नसेल तर नक्की वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 09:51 AM2022-08-22T09:51:28+5:302022-08-22T09:56:12+5:30

अल्पकालीन अथवा अत्यल्पकालीन फंडात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी डेट फंडांत लो ड्युरेशन फंड हा एक उत्तम पर्याय आहे.

सध्या जगभरात व्याजदरांत वाढीचा कल असल्यामुळे दीर्घकालीन फंडांतील गुंतवणुकीत जोखीम असल्याचे गुंतवणूक तज्ज्ञांचे मत आहे. या स्थितीत अल्पकालीन अथवा अत्यल्पकालीन फंडात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी डेट फंडांत लो ड्युरेशन फंड हा एक उत्तम पर्याय आहे. त्यालाच शॉर्ट ड्युरेशन फंड असेही म्हटले जाते. याची मॅच्युरिटी साधारणत: १ वर्षाची असते. यात १८ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

परतावा तक्ता पाहिल्यास १ वर्षात १८ टक्क्यांपर्यंत परतावा देणारे अनेक फंड दिसून येतात. हा परतावा अन्य अल्पबचत योजनांच्या तुलनेत ४ पट अधिक आहे. काही शॉर्ट टर्म फंड पुढीलप्रमाणे आहेत.

बँक ऑफ इंडिया शॉर्ट टर्म इनकम फंड : या फंडाने १८ टक्के परतावा दिला आहे. यात कमीत कमी पाच हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच किमान एक हजार रुपयांची एसआयपी आवश्यक असते. या फंडाने सहा महिन्यांत १६ टक्के परतावा दिला आहे. फंडातील एकूण संपदा (ॲसेट्स) ३१ जुलै २०२२ रोजी ४६ कोटी रुपये होती.

या फंडाने १ वर्षात १२ टक्के परतावा दिला आहे. यात किमान ५ हजार रुपये गुंतवणूक करता येते. एसआयपी ५०० रुपयांची हवी. ३१ जुलै २०२२ रोजी एकूण संपदा ५७८ कोटी रुपये होती.

या फंडाने १ वर्षात ११.५० टक्के परतावा दिला आहे. किमान गुंतवणूक पाच हजार रुपये करता येते. ५०० रुपये एसआयपी बंधनकारक आहे. ३१ जुलै २०२२ रोजी एकूण संपदा ३० कोटी रुपये होती.

या फंडाने १ वर्षात १०.५० टक्के परतावा दिला आहे. किमान गुंतवणूक पाच हजार रुपये करता येते. २५० रुपयांची एसआयपी बंधनकारक आहे. ३१ जुलै २०२२ रोजी फंडातील एकूण संपदा २१० कोटी रुपये होती.

यात १ वर्षात ८.२८ टक्के परतावा मिळाला आहे. किमान गुंतवणूक ५०० रुपये करता येते. किमान ५०० रुपयांची एसआयपी बंधनकारक आहे. ३१ जुलै २०२२ रोजी फंडातील एकूण संपदा २३१५ कोटी रुपये होती