Get Aadhaar Card Center franchise and earn lakhs of rupees; Learn the simple process
Aadhaar Card केंद्राची फ्रेन्चायझी घ्या अन् कमवा लाखो रुपये; जाणून घ्या सोपी प्रकिया By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 04:48 PM2021-08-09T16:48:45+5:302021-08-09T16:56:02+5:30Join usJoin usNext आधार कार्ड (Aadhaar Card) हा एक अत्यंत महत्त्वाचा सरकारी दस्तावेज आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. अनेक सरकारी तसंच खासगी कामांमध्ये आधार कार्ड आवश्यक असते. आधार कार्ड बनवून घेण्यासाठी किंवा त्यात काही सुधारणा करायच्या असतील तर त्यासाठी आधार केंद्रांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशा आधार केंद्राची फ्रेन्चायझी घेऊन तुम्हीही चांगली कमाई करू शकता. तुम्ही जर सध्या पैसे कमवण्यासाठी एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर, तर आधार कार्ड फ्रेंचाइजी घेण्यासाठी चांगली संधी आहे. आधार कार्डची फ्रेंचाइजी घेऊन कमाईची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. पण ही फ्रेंचाइजी घेणार कशी? हा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक लायसन्स घ्यावं लागेल. हे लायसन्स घेण्यासाठी एक परीक्षा पास करावी लागेल. जाणून घ्या काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया... लायसन्स घेण्यासाठी UIDAIकडून एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा UIDAI सर्टिफिकेशनसाठी घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यास आपल्याला आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक करावं लागतं. त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल. सर्व प्रथम एनएसईआयटीच्या (NSEIT) वेबसाइटवर जा. इथं तुम्हाला Create New User ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. आता एक एक्सएमएल फाईल उघडेल. तिथं Share Code enter टाकण्यास सांगितले जाईल. एक्सएमएल फाइल आणि शेअर कोडसाठी आपण आधारच्या वेबसाइट https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन आपले ऑफलाइन ई-आधार डाउनलोड करू शकता. यावेळी एक्सएमएल फाईल आणि शेअर कोड दोन्ही डाउनलोड केले जातील. वर उल्लेख केलेल्या ठिकाणी त्यांचा वापर करावा. आता आणखी एक फॉर्म येईल ज्यामध्ये आपल्याला काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड येईल. याद्वारे आपण Aadhaar Testing and Certification पोर्टलवर लॉग इन करू शकाल. त्यानंतर Continue बटणावर क्लिक करा. आता एक फॉर्म समोर येईल, त्यामध्ये विचारलेली माहिती योग्यरित्या भरा. हा फॉर्म भरल्यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करावी लागेल. आता तुम्हाला प्रिव्ह्यू ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्ही फॉर्ममध्ये दिलेली माहिती बरोबर आहे की नाही हे याची खात्री करून घ्या. आता Proceed to submit form वर क्लिक करा. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर 1 ते 2 दिवसांनंतर वेबसाइटवर परत लॉग इन करा आणि Book Center वर क्लिक करा. इथं आपल्या जवळचे कोणतेही केंद्र निवडा. तुम्हाला या केंद्रावर आधार परीक्षा द्यावी लागेल. तारीख आणि वेळ निवडा आणि फॉर्म सबमिट करा. यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला प्रवेशपत्र (Admit Card) मिळेल. हे प्रवेश पत्र डाउनलोड करून प्रिंट करा.टॅग्स :आधार कार्डव्यवसायभारतAdhar CardbusinessIndia