Mobile Fancy Number : मोफत मिळतोय फॅन्सी नंबर, ‘या’ कंपनीनं आणली ऑफर; पाहा प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 01:40 PM2022-06-28T13:40:09+5:302022-06-28T13:46:52+5:30

अनेकांना आपल्याकडे म्एखादा फॅन्सी नंबर किंवा व्हिआयपी मोबाइल नंबर असावा असं वाटत असतं.

अनेकांना आपल्याकडे म्एखादा फॅन्सी नंबर किंवा व्हिआयपी मोबाइल नंबर असावा असं वाटत असतं. व्हिआयपी किंवा फॅन्सी नंबर हे असे युनिक नंबर्स असतात, जे आपण सहजरित्या लक्षातही ठेवू शकतो.

परंतु बहुतांश टेलिकॉम कंपन्या फॅन्सी नंबर्स किंवा व्हिआयपी मोबाइल नंबर्स सहज उपलब्ध करून देत नाही. यासाठी एकतर ऑक्शन केलं जातं किंवा त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कमही द्यावी लागते.

काही कंपन्या मात्र हे फॅन्सी नंबर्स मोफतही देतात. याशिवाय व्हर्च्युअल व्हिआयपी क्रमांक ऑनलाइन देखील खरेदी केला जाऊ शकतो. अनेक वेबसाईट्स व्हर्च्युअल व्हिआयपी मोबाइल क्रमांकांची विक्री करतात. यासाठी ग्राहकांकडून विशिष्ट रक्कम घेतली जाते.

बीएसएनएल ही सरकारी कंपनीदेखील प्रीमिअम नंबर्सची विक्री करते. यासाठी तुम्हाला ऑक्शनमध्ये भाग घ्यावा लागेल. कंपनीच्या वेबसाईटवर अनेक फॅन्सी आणि प्रीमिअम मोबाईल नंबर्सची लिस्ट उपलब्ध आहे.

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला eauction.bsnl.co.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर फॅन्सी नंबरच्या लिस्ट मधून तुम्ही कोणताही नंबर सिलेक्ट करू शकता.

तुम्ही सध्या मोफत फॅन्सी नंबर्सही विकत घेऊ शकता. याची सुविधा व्होडाफोन आयडिया ही टेलिकॉम कंपनी देत आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://www.myvi.in या वेबसाईटवर जावं लागेल. यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला दिलेल्या ऑप्शन्समधून न्यू कनेक्शन ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल.

यानंतर तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. त्यापैकी तुम्हाला फॅन्सी नंबर्सचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुमच्या गरजेनुसार तुम्ही पोस्टपेड किंवा प्रीपेड नंबर्स सिलेक्ट करू शकता. यानंतर तुम्हाला तुमच्या एरियाचा कोड द्यावा लागेल.

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा अॅक्टिव्ह मोबाईल क्रमांकही द्यावा लागेल, त्यानंतर कंपनीकडून तुमच्या घरी फॅन्सी नंबर पोहोचवला जाईल. हा नंबर तुम्ही तुमच्या सामान्य क्रमांकाप्रमाणे वापरू शकता.