शेवटची संधी! LPG सिलिंडरवर मिळवा ७०० रुपयांपर्यंत कॅशबॅक, फक्त ७ दिवस शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:05 PM2021-03-24T12:05:00+5:302021-03-24T12:17:18+5:30

LPG Gas Cylinder Booking: घरगुती सिलिंडर बुक करण्याची ही ऑफर फक्त ३१ मार्च २०२१ पर्यंतच आहे. म्हणजेच तुमच्याकडे स्वस्तात सिलिंडर मिळविण्यासाठी शेवटचे ७ दिवल शिल्लक आहेत. कसं करायचं बुकिंग जाणून घेऊयात...

ऑनलाइन पेमेंट अॅग्रीगेटर पेटीएमनं (Paytm) ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ७०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.

Paytm ची ही खास ऑफर केवळ ३१ मार्चपर्यंत असणार आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर अगदी स्वस्तात खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे फक्त ७ दिवस शिल्लक आहेत.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनवर Paytm App डाऊनलोड करावं लागेल आणि त्या अॅपवरुन सिलिंडरचं बुकिंग करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ७०० रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल.

दिल्लीत १४.२ किलोग्रॅमचा घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८१९ रुपये इतकी आहे. Paytm च्या ऑफर सकट तुम्हाला सिलिंडर केवळ १९१ रुपयांत खरेदी करता येईल. पेटीएमची ही ऑफर केवळ या अॅपवरुन पहिल्यांदा गॅस बुकिंग करणाऱ्यांसाठी असणार आहे.

सर्वात आधी Paytm अॅपवर जााऊन Show More वर क्लिक करा. त्यानंतर ‘Recharge and Pay Bills’ या ऑप्शनवर क्लिक करा. तुमच्यासमोर book a cylinder चा पर्याय दिसेल.

याठिकाणी तुम्हाला तुमच्या गॅस सिलिंडर घरपोच करणाऱ्या एजंसीची निवड करावी लागेल.

त्यानंतर सिलिंडर बुक करण्याआधी FIRSTLPG चा प्रोमो कोड भरावा लागेल. प्रोमो कोडचा वापर केल्यानंतर सिलिंडरची पूर्ण किंमत तुमच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होईल.

कॅशबॅकची ऑफर ३१ मार्च २०२१ रोजी संपणार आहे. सिलिंडर बुक केल्याच्या २४ तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक देखील प्राप्त होईल. यासाठीचं एक स्क्रॅचकार्ड तुमच्या पेटीएम अॅपमध्ये येईल.

पेटीएमचं हे कॅशबॅक स्क्रॅच कार्ड तुम्हाला सात दिवसांच्या आत वापरावं लागणार आहे.