ही छोटी कंपनी बोनससोबतच शेअर वाटण्याच्याही तयारीत, 3 वर्षांत 1 लाखाचे केले 68 लाख रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 09:35 PM2023-01-29T21:35:25+5:302023-01-29T21:45:24+5:30

ग्लोबल कॅपिटल मार्केट्स 1:1 या रेशोत बोनस शेअर देण्याच्या तयारीत आहे. अर्थात, कंपनी प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर देत आहे.

एक छोटी कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सना मोठे गिफ्ट देत आहे. या स्मॉलकॅप कंपनीचे नाव आहे, ग्लोबल कॅपिटल मार्केट्स. नॉन-बँकिंग फायनांशिअल कंपनी ग्लोबल कॅपिटल मार्केट्स (Global Capital Markets) बोनस शेअरसोबतच शेअर्सदेखील वाटण्याच्या तयारीत आहे.

ग्लोबल कॅपिटल मार्केट्स 1:1 या रेशोत बोनस शेअर देण्याच्या तयारीत आहे. अर्थात, कंपनी प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर देत आहे. ग्लोबल कॅपिटल मार्केट्सच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षांपेक्षाही कमी काळात इनव्हेस्टर्सना 6700 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

बोनस शेअरसोबत कंपनी वाटतेय स्टॉक - ग्लोबल कॅपिटल मार्केट्सने स्टॉक एक्सचेन्जला दिलेल्या माहितीनुसार, तिच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी 27 जानेवारी 2023 रोजी झालेल्या मिटिंगमध्ये 1:1 या रेशोत बोनस शेअर देण्यासंदर्भात आणि 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्सच्या 1 रुपये फेस व्हॅल्यूमध्ये सब-डिव्हिजनला मंजूरी दिली आहे.

कंपनीने म्हटले आहे की, गुरुवारी 9 फेब्रुवारी 2023 रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग होईल, ज्यात 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे अन-ऑडिडेट फायनांशिअल रिझल्ट्स अप्रूव्ह केले जातील.

3 वर्षांपेक्षाही कमी काळात 6703 टक्क्यांचा परतावा - नॉन-बँकिंग फायनांशिअल कंपनी ग्लोबल कॅपिटल मार्केट्सचे (Global Capital Markets) शेअर 30 एप्रिल 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 51 पैशांवर होते. कंपनीचे शेअर 27 जानेवारी 2023 ला बीएसईवर 34.70 रुपयांवर बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या इन्व्हेस्टर्सना 6703 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

3 वर्षांपेक्षाही कमी काळात 1 लाखाचे झाले 65 लाखहून अधिक - जर एखाद्या व्यक्तीने 30 एप्रिल 2020 लोजी ग्लोबल कॅपिटल मार्केट्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि ही गुंतवणूक आतापर्यंत कायम ठेवली असती तर आता हे पैसे 68.03 लाख रुपये झाले असते.

एक वर्षात दिला 480 टक्क्यांचा परतावा - ग्लोबल कॅपिटल मार्केट्सच्या (Global Capital Markets) शेअर्सनी गेल्या एका वर्षात इन्व्हेस्टर्सना 480 टक्क्यांचा परतावा दिला आहे. नॉन-बँकिंग फायनांशिअल कंपनीचे शेअर 31 जानेवारी 2022 रोजी बीएसईवर 5.98 रुपयांवर होते. कंपनीचे शेअर 27 जानेवारी 2023 ला 34.70 रुपयांवर बंद झाले.

ग्लोबल कॅपिटल मार्केट्सच्या शेअरची 52 उच्चांक 45 रुपये आहे. तर 52 आठवड्यांतील निचांक 3.79 रुपये आहे. (टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)