Gold Rate Today: दरात मोठी घसरण! हॉलमार्किंग सोन्याचा भाव ४६ हजारांवर; चांदीही झाली स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 12:50 PM2021-06-29T12:50:05+5:302021-06-29T12:54:33+5:30

Gold Rate Today: तीन सत्रात तेजीत असलेल्या सोने आणि चांदीमध्ये नफावसुली झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच दोन महिन्यांच्या नीचांकी स्तरावर असलेल्या सोन्याच्या भावात वाढ झाली होती. (Gold Rate Today)

तीन सत्रात तेजीत असलेल्या सोने आणि चांदीमध्ये नफावसुली झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने मंगळवारी सोन्याच्या किमतीत १३० रुपयांची तर चांदीमध्ये ३२० रुपयांची घसरण झाली आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने १३० रुपयांनी स्वस्त झाले. बाजार खुला झाला, तेव्हा सोने ४७००८ रुपयांवर होते. त्यानंतर त्यात घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव ६८९११ रुपये असून त्यात ३२२ रुपयांची घसरण झाली आहे.

एमसीएक्सवर सोमवारी बाजार बंद होताना ४६९९७ रुपयांवर स्थिरावला होता. त्यात ७२ रुपयांची वाढ झाली होती. चांदीमध्ये २३४ रुपयांची वाढ झाली आणि चांदीचा भाव ६९१८४ रुपयांवर स्थिरावला होता.

मात्र, त्यात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार १७० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४७ हजार १७० रुपये आहे.

दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार १५० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५० हजार २५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४ हजार ३५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार ४०० रुपये आहे.

कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार ६७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९ हजार २२० रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.२ टक्के घसरण झाली.

सोन्याचा भाव १७७५.४२ डॉलर प्रती औंस आहे. याआधी सोन्याचा भाव १७७० डॉलरपर्यंत खाली घसरला होता. तर चांदीचा भाव २६.०७ डॉलर आहे.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यात देशात ६.९१ अब्ज डॉलर्स सोन्याची आयात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अर्थव्यवस्था सावरल्यास सोन्याचा भाव आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोना नियंत्रण आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्याने सोने महागणार किंवा स्वस्त होणार यासंदर्भात कमॉडिटी विश्लेषकांमध्ये मत मतांतरे असल्याचे दिसून येत आहे.