Gold and silver Price Today 28 July In Commodity Market
सोन्याच्या दराने बनवला नवा रेकॉर्ड तर चांदीही करणार मालामाल; जाणून घ्या आजचे दर By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:18 PM2020-07-28T12:18:42+5:302020-07-28T12:21:28+5:30Join usJoin usNext मंगळवारी सोन्याच्या किंमतीने नवा रेकॉर्ड बनवला आहे. १० ग्रॅम सोन्याच्या दर जवळपास ५२ हजार ४३५ रुपयांपर्यंत पोहचलं आहे. सोमवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅमला ५२ हजार ४१४ इतकी होती. चांदीच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या असून एक किलो चांदीसाठी ६७ हजार ५६० रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या ८ वर्षात चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. एंजेल कमोडिटीचे अनुज गुप्ता यांन सांगितले की, येणाऱ्या काळात सोने-चांदीचे भाव आणखी वाढणार आहेत. अमेरिका चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर डॉलर रुपयाच्या तुलनेत खाली घसरेल असंही त्यांनी सांगितले आहे. सोने-चांदीचा दरात होणार वाढ पुढील काळात कायम राहील. सोन्याचा भाव ५३ हजारांच्या वरच राहील तर चांदी जवळपास ७० हजारांपर्यंत पोहचेल. आंतरराष्ट्रीय बाजारा सोन्याचे भाव २ हजार डॉलरपर्यंत पोहचू शकते तर चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत ९०५ रुपयांनी वाढ झाला, १० ग्रॅम सोन्यासाठी ५२ हजार ९६० रुपये मोजावे लागले होते, शुक्रवारी सोन्याचा दर ५२ हजार ५५ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. चांदीच्या किंमती सोमवारी ३ हजार ३४७ रुपयांनी वाढल्या, शुक्रवारी चांदीचा भाव ६२ हजार ३२३ प्रतिकिलो होता तो दर जवळपास ६५ हजार ६७० रुपयांपर्यंत पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदी विक्रमी पातळीवर व्यापार करत आहेत. सोमवारी, सोन्याचे दर १९३५ डॉलर प्रति औंस होते आणि चांदी २४ डॉलर प्रति औंस होती. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव कायम ठेवत जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याच्या पार्श्वभूमीवर किंमतींचा कल कायम आहे. बँक ऑफ अमेरिकेने सांगितले की, २०२१ च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस ३००० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल. असे झाल्यास २४ कॅरेट सोन्याची किंमत त्यावेळी दहा ग्रॅमसाठी ७३ हजार रुपयांपर्यंत पोहोचेल. एमसीएक्सवर सकाळी १०.२० वाजता ऑगस्टच्या डिलिव्हरीसाठीचे सोन्याचे भाव १९३ रुपयांनी वाढून ५२ हजार २९४ रुपये, ऑक्टोबरच्या डिलिव्हरीसाठीचे सोन्याचे भाव १५८ रुपये वाढून ५२ हजार ४१० रुपये आणि दहा डिसेंबरच्या सोन्याच्या किंमती १०० रुपयांनी वाढून ५२ हजार ५११ रुपये प्रति दहा ग्रॅम झाले आहेत. सकाळी १०.२० वाजता एमसीएक्सवर सप्टेंबरच्या डिलीव्हरीसाठी चांदीची किंमत ९२७ रुपयांनी वाढून ६६ हजार ४५५ रुपये आणि डिसेंबर डिलीव्हरीसाठी चांदी ९१८ रुपयांनी वाढून ६७ हजार ९५५ रुपये प्रतिकिलोवर ट्रेड करत होता. टॅग्स :सोनंचांदीGoldSilver