Gold ATM: एटीएममधून बाहेर पडणार सोने, सुरू झाले देशातील पहिले सोन्याचे एटीएम,कसं चालणार जाणून घ्या? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 01:46 PM 2022-12-06T13:46:59+5:30 2022-12-06T13:58:37+5:30
आपण आतापर्यंत पैशाचे एटीएम पाहिली असतील. देशात असा एकपण प्रदेश राहिलेला नाही जिथे पैशाचे एटीएम लागलेले नाही. आपण आतापर्यंत पैशाचे एटीएम पाहिली असतील. देशात असा एकपण प्रदेश राहिलेला नाही जिथे पैशाचे एटीएम लागलेले नाही. पण आता सोन्याचे एटीएमही सुरू होणार आहेत. या एटीएममधून तुम्हाला एटीएमद्वारे सोनं काढता येणार आहे.
भारतातील पहिले सोन्याचे एटीएम सुरू झाले आहे. या एटीएमद्वारे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून सोने खरेदी करता येणार आहे.या एटीएममधून 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंतची सोन्याची नाणी खरेदी करता येणार आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये देशातील पहिले रिअल टाइम सोन्याचे एटीएम बसवण्यात आले आहे, ज्यातून सोन्याची नाणी काढता येणार आहेत.
ओपनक्यूब टेक्नॉलॉजीजच्या मदतीने हैदराबादस्थित कंपनी गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेडने देशातील पहिले सोन्याचे एटीएम सुरू केले आहे. या एटीएमद्वारे ग्राहक सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरू शकतात. हे एटीएम सामान्य एटीएम सारखेच काम करते.
गोल्डसिक्का हे सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. कंपनीचे सीईओ सी. तरुज यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या एटीएममधून 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंतची सोन्याची नाणी काढता किंवा खरेदी करता येणार आहेत. या एटीएमवरील सोन्याची किंमत थेट अपडेट केली जाईल, जेणेकरून फसवणूक होऊ नये. या गोल्ड एटीएमची सेवा २४ तास उपलब्ध असेल.
कंपनीचे सीईओ सी. तरुज यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी देशभरात आणखी एटीएम उघडणार आहे. कंपनी पेड्डापल्ली, वारंगल आणि करीमनगर येथेही गोल्ड एटीएम उघडण्याचा विचार करत आहे. याशिवाय, पुढील 2 वर्षांत भारतभर सुमारे 3,000 गोल्ड एटीएम उघडण्याची कंपनीची योजना आहे.
यापूर्वी, गेल्या वर्षी हरियाणातील गुरुग्राममध्ये देशातील पहिले ग्रीन एटीएम बसवण्यात आले होते. यावळी अन्न आणि पुरवठा विभागाचे प्रभारी आणि हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी धान्याच्या एटीएमची माहिती दिली होती, धान्याचे एटीएम बसवल्यानंतर सरकारी दुकानातून रेशन घेणाऱ्यांच्या सर्व तक्रारी दूर केल्या जातील, असं म्हणाले होते.
'हे मशीन बसवण्याचा उद्देश “योग्य प्रमाणात योग्य लाभार्थी” आहे. यामुळे केवळ ग्राहकांनाच फायदा होणार नाही, तर सरकारी डेपोतील धान्य टंचाईचा त्रासही संपेल, असंही हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले होते.