8 महिन्यात सोने सर्वात स्वस्त...! पण, विकत घेण्याची ही योग्य वेळ आहे का? By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 17, 2021 10:07 PM 2021-02-17T22:07:54+5:30 2021-02-17T22:22:06+5:30
सरकारने बजेटमध्ये सोन्यावरील सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा केली. याशिवय इतरही काही कारणांमुळे सोन्याचा भाव आठ महिन्यांत सर्वात कमी झाला आहे. (Gold : is this the right time to invest in gold find out here) MCX वर एप्रिलचा सोन्याचा वायदा भाव 0.27 टक्क्यांनी कमी होऊन 46,772 रुपये प्रती 10 ग्रॅमवर आला आहे. जून 2020 नंतर हा सोन्याचा सर्वात कमी भाव आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर 56,200 रुपयांवर पोहोचला होता. (is this the right time to invest in gold find out here)
डॉलरचा भाव वाढतोय - अमेरिकन डॉलर सात्याने मजबूत होताना दिसत आहे. इतर परदेशी चलनाच्या तुलनेत डॉलरची स्थिती दर्शवणारा ‘डॉलर इंडेक्स’ बुधवारी 0.23% वर गेला. याशिवाय अमेरिकन ट्रेझरी यील्डमध्येही वाढ झाली आहे. यामुळेही सोन्यावरील दबाव वाढला आहे.
सीमाशुल्क कमी केल्याने भाव घसरले - सरकारने बजेटमध्ये सोन्यावरील सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा केली. याशिवय इतरही काही कारणांमुळे सोन्याचा भाव आठ महिन्यांत सर्वात कमी झाला आहे.
जो बायडेन यांच्या पॅकेजचा परिणाम - अमेरिकेच्या फेडरल रिझर्वच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात सकारात्मक वक्तव्यामुळे तेथील ट्रेझरी यील्डमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या 1.9 अब्ज डॉलरच्या प्रोत्साहन पॅकेजसंदर्भातही बाजार पॉझिटिव्ह आहे. यामुळएही सोन्यावरील दबाव वाढला आहे.
मंगळवारी सोन्याचे भाव घसरले. दिल्लीमध्ये बुधवारीदेखील 22 कॅरेट सोन्याचे भाव 46,400 रुपये प्रती 10 ग्रॅमवरच आहेत. तर मुंबईत हा भाव 46,240 रुपये, चेन्नईत 44,650 रुपये आणि कोलकात्यात 46,720 रुपये प्रती 10 ग्रॅम होता.
गुंतवणुकीची ही योग्य वेळ आहे? - सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे, का? यावर भाष्य करायचे असेल, तर आपल्याला गेल्या एक वर्षातील सोन्यावरील रिटर्नवर नजर टाकावी लागेल. MCX वर सोन्यावरील एका आठवड्याचा रिटर्न निगेटिव्हमध्ये 3.1 टक्के होता. तर एका महिन्यात 4.9 टक्के निगेटिव्ह रिटर्न होता. तसेच यावर्षात आतापर्यंत 7.3 टक्के निगेटिव्ह रिटर्न आहे.
मात्र, एका वर्षात सोन्याने 12.3 टक्के आणि 3 वर्षांत 51 टक्के रिटर्न दिले आहेत. अशात सोन्याच्या घसरत्या किमतीचा फायदा लाँग टर्मसाठी गुंतवणूक केल्यास घेतला जाऊ शतो.
कसा ठरतो सोन्याचा भाव? कोरोना काळात लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.
आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना अशी नावे आहेत. सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री, असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.
8 महिन्यात सोने सर्वात स्वस्त...