रोजच्या रोज स्वस्त होतंय सोनं! आज ₹58900 च्याही खाली घसरला भाव, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 04:24 PM2023-08-16T16:24:37+5:302023-08-16T16:29:07+5:30

22 कॅरेट सोन्याच्या किंमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,700 रुपये तर मुंबईमध्ये 54,550 रुपये एवढी आहे...

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आजही सोने स्वस्त झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX गोल्ड प्राइस) आज सोन्याचा भाव 58900 रुपयांच्या खाली आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसत आहे. याशिवाय आज चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

10 ग्रॅम सोन्याचा भाव - मल्टी कमोडिटी एक्सचेन्जवर सोन्याचा दर आज 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह 58,862 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. याशिवाय चांदीचा दर 0.09 टक्क्यांच्या वाढीस 70,020 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.

जागतिक बाजाराची स्थिती - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात नरमाई दिसत आहे. आज कॉमॅक्सवर सोन्याचा दर प्रति औंस 1935 डॉलरवर आहे. याच बरोबर, चांदीची किंमत प्रति औंस 22.63 डॉलरवर आहे. जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे डॉलरमध्ये रिकव्हरी होताना दिसत आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर? - 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,700 रुपये, मुंबईमध्ये 54,550 रुपये, कोलकात्यात 54,550 रुपये, लखनऊमध्ये 55,700 रुपये, बेंगळुरूमध्ये 54,550 रुपये, जयपूरमध्ये 54,700 रुपये, पाटण्यात 54,600 रुपये, हैदराबादमध्ये 54,550 रुपये आणि भुवनेश्वरमध्ये 54,550 रुपये आहे.

लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट - जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.