सोन्याच्या किमतीने रचला इतिहास! आता १० ग्रॅम सोन्यासाठी इतके पैसे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:07 IST2025-04-11T16:03:45+5:302025-04-11T16:07:30+5:30
gold price hike : सोनाने आज सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम आता लाखाच्या जवळ पोहचली आहे.

तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमची झोप उडवू शकते. सोन्याने आज आपला सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या किमतीत सुमारे २९९० रुपयांची वाढ झाली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत २,९१३ रुपयांनी वाढून ९३,०७४ रुपये झाली आहे, जी पूर्वी ९०,१६१ रुपये होती. त्याच वेळी, आज एक किलो चांदीची किंमत १,९५८ रुपयांनी वाढून ९२,६२७ रुपये प्रति किलो झाली. २८ मार्च रोजी चांदीने १,००,९३४ रुपयांचा सर्वोच्च दर गाठला होता. तर ३ एप्रिल रोजी सोन्याने ९१,२०५ रुपयांचा सर्वोच्च दर गाठला होता.
दिल्लीत २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८७,६०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९५,५५५ रुपये आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८७,४५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९५,४०० रुपये आहे.
कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८७,४५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९५,४०० रुपये आहे. चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८७,४५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९५,४०० रुपये आहे.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे व्यापार युद्धाचा धोका वाढला असून जागतिक मंदीची शक्यताही वाढली आहे. अशा परिस्थितीत, लोक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. कारण मंदीच्या काळात सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली.
या वर्षी रुपया सुमारे ४% ने घसरला आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढला आहे. लग्नसराईचा काळ जवळ येत असताना, सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढत आहे.