Gold Price : लग्नसराईच्या काळात आली आनंदाची बातमी! सोनं 3500 रुपयांनी स्वस्त, पटापट चेक करा लेटेस्ट रेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 01:28 PM2023-02-28T13:28:17+5:302023-02-28T13:32:28+5:30

MCX वर चांदी 0.45 टक्क्यांनी घसरून 63,636 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे.

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आजही स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी आहे. सध्या सोन्याचे दर सातत्याने कमी होताना दिसत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेन्जव आज सोन्याचा दर 55,000 रुपयांवर आल्याचे दिसत आहे.

आज चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण झाल्याचे दिसत आहे. आज चांदीचा दर 63,000 रुपयांवर आला आहे. कालही सोन्याच्या दरात घसरण दिसून आली.

3500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं - मल्टी कमोडिटी एक्सचेन्जवर सोन्याचा दर आज 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह 55,360 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. गेल्या 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा दर आपल्या विक्रमी उच्चांकावर होता. या दिवशी सोन्याचा दर 58,882 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. यातुलनेत आता सोने 3522 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

चांदीही घसरली - MCX वर चांदी 0.45 टक्क्यांनी घसरून 63,636 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे. सोमवारीही चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती.

ग्लोबल मार्केटमध्ये काय आहे भाव? - ग्लोबल मार्केटसंदर्भात बोलायचे झाल्यास, येथेही सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली आहे. योथे सोन्याचा दर 1806.50 डॉलर प्रति ओंसवर होता. तसेच, यूएस गोल्ड फ्यूचर्स देखील 1,824.90 डॉलर प्रति औंसवर आहे. याशिवाय चांदी 20.75 डॉलर प्रति औंसवर आहे.

लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट - जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.

येथे चेक करा दर - आपण घरबसल्याही सोन्याचा दर चेक करू शकतात. इंडियन बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशननुसार आपण केवळ 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन दर जाऊन घेऊ शकतात. आपण ज्या क्रमांकावरून मेसेज करता त्याच क्रमांकावर आपल्याला मैसेज येईल.