Gold Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! झालं 2000 रु.पेक्षाही अधिक स्वस्त, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 04:54 PM2023-02-16T16:54:45+5:302023-02-16T17:00:30+5:30

चांदीदेखील जवळपास चार हजार रुपयांनी खाली आली आहे. सोने आणि चांदीचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

जर आपल्या घरात अथवा कुटुंबात नजिकच्या काळात एखादे लग्न अथवा काही मोठा कार्यक्रम असेल, तर सध्या सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे. गेल्या काही दिवसांत विक्रमी वाढ झालेल्या सोन्याच्या दरात तब्बल 2300 रुपयांची घसरण झाली आहे.

याशिवाय, चांदीदेखील जवळपास चार हजार रुपयांनी खाली आली आहे. सोने आणि चांदीचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा दर 58882 रुपये या र‍ेकॉर्ड लेव्हलवर पोहोचला होता. याशिवाय, चांदीने 16 जानेवारीला 69167 रुपये हा विक्रमी टप्पा गाठला होता. मात्र आता यात मोठी घसरण दिसत आहे.

MCX वर सोन्या-चांदीच्या दरात तेजी - सराफा बाजारात सोन्याच्या दरात भलेही घसरण दिसून आली, पण गुरुवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदी दोहोंच्याही दरात तेजी दिसून आली. दोन आठवड्यांपूर्वी सोन्याचा दर 58,000, तर चांदीचा दर 71,000 रुपयांवर पोहोचला होता.

गुरुवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) दुपारच्यावेळी सोने 46 रुपयांच्या मजबूतीसह 56172 रुपयांवर ट्रेड करत होते. याच वेळी, चांदीही 152 रुपयांच्या तेजीसह 65573 रुपयांवर ट्रेड करताना दिसून आली. यापूर्वी बुधवारी सोने 56126 रुपये, तर चांदी 65421 रुपये प्रत‍ि क‍िलोवर बंद झाली होती.

सराफा बाजारात संमिश्र कल - सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात गुरुवारीही संमिश्र कल दिसून आला. इंडिया बुलियन्स असोसिएशने (https://ibjarates.com) गुरुवारी जारी केलेल्या किंमतीनुसार, 24 कॅरेट गोल्‍ड घसरून 56343 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर आहेल. तर चांदीच्या दरात किंचित वाढ दिसून आली. चांदी 65474 रुपये प्रत‍ि क‍िलोवर ट्रेड करत आहे. बुधवारी सोन्याचा दर 56478 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅम आणि चांदी 65411 रुपये प्रत‍ि क‍िलोवर होती.

गुरुवारी 23 कॅरेट सोन्याचा दर 56117 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅम, 22 कॅरेट 51610 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट 42257 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर असा आहे.