Gold Price Hike gold silver rate today on 23 march 2021 in bullion market check gold spot prices
Gold Price Hike : सोन्याची दरवाढ, तर चांदीची चमक झाली कमी; पाहा काय आहेत नवे दर By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 05:45 PM2021-03-23T17:45:41+5:302021-03-23T17:53:26+5:30Join usJoin usNext आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात तेजी सध्या अनेक कारणांमुळे सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात वाढ होत असली तरी हे दर मात्र ऑल टाईम हाय पेक्षा जवळपास साडेदहा हजार रूपयांनी कमीच आहेत. मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात विरोधाभास पाहायला मिळाला. सोन्याच्या दरात वाढ झाली. तर चांदीच्या दरात घसरण झाली. दिल्लीत सोन्याच्या दरात ११६ रूपयांची वाढ होऊन ते ४४ हजार ३७४ रूपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले. तर चांदीच्या दरात ११७ रूपयांची घसरण होऊन ती ६५ हजार २९९ रूपयांवर पोहोचली. जागतिक बाजारात आलेल्या तेजीमुळे सोन्याची किंमत वाढत असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. यापूर्वी कामकाजाच्या सत्रात सोन्याचे दर ४४ हजार २५८ रूपये प्रति १० ग्रामच्या स्तरावर होते. चक चांदीचे दर ६५ हजार ४१६ रूपये प्रति किलोच्या दरावर होते. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ११६ रूपयांनी वाढला आहे. याचं मुख्य कारण जागतीक बाजारात तेजीही आहे, असं मत एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनालिस्ट (कमोडिटी) तपन पटेल यांनी व्यक्त केलं. डॉलरच्या तुलनेत रूपया मजबूत होता. तरीही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर १,७३८ डॉलर्स प्रति औंस आणि चांदीचे दर २५.५३ डॉलर्स प्रति औंस इतके होते. सोन्याचा वायदा भाव मंगळवारी ०.१९ टक्क्यांनी घसरून ४४ हजार ८१९ रूपये प्रति १० ग्राम झाला. एमसीएक्सवर ७,८०६ लॉट्सच्या बिझनेस टर्नओव्हरवर एप्रिल महिन्यात दिल्या जाणाऱ्या सोन्याचे दर ८६ रूपयांनी घसरून ४४ हजार ८१९ रूपये प्रति १० ग्राम झाले. टॅग्स :सोनंचांदीपैसाबाजारदिल्लीGoldSilverMONEYMarketdelhi