gold price increase silver price also hike on 28 august 2023 mcx gold price
Gold Price: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं-चांदीत मोठा अपडेट! फटाफट चेक करा लेटेस्ट दर By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 04:14 PM2023-08-28T16:14:23+5:302023-08-28T16:18:15+5:30Join usJoin usNext सोने-चांदीच्या दरात मोठी अपडेट समोर आली आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी अपडेट समोर आली आहे. सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. या आठवड्याची सुरुवात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. अलीकडे सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 58,700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय चांदीचा भाव 73,500 रुपयांच्या आसपास आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याची किंमतीत वाढ होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची किंमत 0.18 टक्के वाढीसह 58745 रुपये प्रति 10 ग्रॅम पातळीवर आहे. चांदीचा भाव 0.01 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 73,555 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर आज येथे भावात वाढ होताना दिसत आहे. Comex वर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत 0.21 टक्क्यांनी वाढून 1,943.90 डॉलरवर आहे. याशिवाय, चांदीची फ्युचर्स किंमत 0.11 टक्के किंवा 0.03 डॉलरच्या वाढीसह 24.61 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. देशाची राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,650 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. याशिवाय, मुंबईत 54,500 रुपये, गुरुग्राममध्ये 54,650 रुपये, कोलकात्यात 54,500 रुपये, लखनऊमध्ये 54,650 रुपये, बेंगळुरूमध्ये 54,500 रुपये, जयपूरमध्ये 54,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत घसरणीनंतर आता सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव आता पुन्हा 58,000 ते 59,000 च्या पातळीवर गेला आहे. याशिवाय चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.टॅग्स :सोनंचांदीGoldSilver