Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 10:38 AM2024-06-03T10:38:57+5:302024-06-03T10:45:36+5:30

Gold Rate Today In India: देशात सोमवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली. निवडणुकांच्या निकालापूर्वी शेअर बाजारात तेजी दिसून आली तर, सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. पाहा काय आहेत नवे दर?

Gold Rate Today In India: देशात सोमवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,६९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तुलनेत काल सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १० रुपयांनी घट झाली आहे. ४ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या निकालापूर्वी सराफा बाजारात सोन्यात घसरण पाहायला मिळत आहे.

चांदीचा किरकोळ भाव ९३,४०० रुपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात १०० रुपयांनी घट झाली आहे. जाणून घेऊया देशातील १२ प्रमुख शहरांमध्ये २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव किती आहे.

३ जून २०२४ रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६,६४० रुपये प्रति १० ग्रॅम होता. दरम्यान, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७२,६९० रुपये आहे.

मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६,४९० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,५४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६,५४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,५९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

जागतिक बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. कॉमेक्सवरील जागतिक सोन्याचा वायदा भाव ०.१७ टक्क्यांनी घसरून २,३४१.८० डॉलर प्रति औंस झाला. तर सोन्याचा जागतिक स्पॉट भाव २,३२१.४३ डॉलर प्रति औंस वर पोहोचला आहे.

जागतिक स्तरावर आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. कॉमेक्सवर चांदीचा वायदा भाव ०.३० टक्क्यांनी घसरून ३०.३५ डॉलर प्रति औंस झाला. तर चांदीचा जागतिक स्पॉट भाव ३०.२२ डॉलर प्रति औंस वर पोहोचला आहे.