Gold Price 5 Nov 2024: तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती? By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 11:31 AM 2024-11-05T11:31:17+5:30 2024-11-05T11:37:50+5:30
Gold Price Today : दिवाळी संपताच या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी घसरण बघायला मिळाली आहे. दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त तेजी बघायला मिळाली. सोन्या-चांदीचा भाव विक्रमी पातळीवर पोहोचला. सोने 82000 रुपये तर चांदीही एक लाखाच्या जवळपास पोहोचली होती. मात्र दिवाळी संपताच या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी घसरण बघायला मिळाली आहे.
दिवाळीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी स्टॉकिस्ट आणि किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या विक्रीमुळे सोने विक्रमी उच्चांकावरून घसरले आणि 1300 रुपयांनी स्वस्त होऊन 81100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. अखिल भारतीय सराफा संघाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
82400 रुपयांच्या विक्रमी किंमतीवरून खाली आले सोने - अखिल भारतीय सराफा संघाने दिलेल्या माहितीनुसार, 99.9 टक्के शुद्धतेचे सोने दिवाळीच्या दिवशी अर्थात गुरुवारी दिल्लीत 82,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर या विक्रमी पातळीवर कायम होते. चांदीच्या दरावरही विक्रीचा दबाव राहिला आणि ती 95,000 रुपयांच्या खाली आली. चांदी 4600 रुपयांनी घसरून 94,900 रुपये प्रतिकिलोवर आली.
तत्पूर्वी, गुरुवारच्या व्यवहारादरम्यान चांदी 99500 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. स्थानिक बाजारपेठेत ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटेल आहे.
सोन्याच्या किंमतीत 1300 रुपयांची घसरण - सोमवारी 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 1,300 रुपयांनी घसरून 80,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. गुरुवारी शेवटच्या सत्रात तो 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. हा आजपर्यंतचा विक्रमी उच्चांक होता.
LKP सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष, संशोधन विश्लेषक (कमोडिटी आणि चलन) जतिन त्रिवेदी यांनी म्हटले आहे की, 'सोन्याच्या किमतीत अस्थिरता दिसून आली. कारण त्याला कॉमेक्सवर 2730 डॉलरच्या आसपास समर्थन मिळाले, मात्र, 2750 डॉलरवर जाण्यासाठी संघर्ष करावा लागला.'
बाजारात संमिश्र धारणा राहण्याची शक्यता - त्रिवेदी म्हणाले, "येणाऱ्या दोन दिवसांत अमेरिकन निवडणुकांचे निकाल येणार आहेत. यामुळे बाजारात संमिक्ष धारणा बघायला मिळू शकते. याचा परिणाम म्हणून, MCX वर 78000 ते 79000 दरम्यान व्यापार होऊ शकतो.''
अशी असेल आजची स्थिती - एमसीएक्सवर सुरुवातीच्या ट्रेडिंगदरम्यान सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी साधारणपणे 9.15 वाजण्याच्या सुमारास, सोने 138 रुपयांच्या घसरणीसह 78284 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, तर चांदी 140 रुपयांनी घसरून 94144 रुपये प्रति किलोवर व्यवहार करताना दिसून आली.
मंगळवारच्या व्यवहारात सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एक दिवस आधी बाजारात आलेली मोठी घसरण दुसऱ्या दिवशीही दिसण्याची शक्यता कमीच आहे.