Gold Price Today : आनंदाची बातमी! सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 19:27 IST2024-09-04T19:23:44+5:302024-09-04T19:27:15+5:30

देशभरात काही दिवसातच गणेशोत्सव सुरू होणार आहे. याआधीच सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

देशभरात ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज बुधवारी दिल्लीत सोनं ४५० रुपयांनी स्वस्त झालं. तर मुंबईतही तिच परिस्थिती पाहायला मिळाली.

आज बुधवारी ४ सप्टेंबर रोजी दिल्लीत सोन्याचा भाव ४५० रुपयांनी घसरून ७३,६०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

मागील सत्रात ९९.९ टक्के शुद्धता असलेले सोन्याचे दर ७४,०५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

सराफा बाजारानुसार, चांदीचा भावही १,६५० रुपयांनी घसरून ८३,६०० रुपये प्रति किलो झाला आहे.

दरम्यान, ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भावही ४५० रुपयांनी घसरून ७३,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्स सोन्याचा भाव ०.१३ टक्क्यांनी घसरून २,५१९.८० प्रति औंस डॉलर झाला.