Gold Rate Today : सोने-चांदीचे दर गडगडले? फटाफट चेक करा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:20 PM2023-03-20T12:20:31+5:302023-03-20T12:25:28+5:30

Gold Rate Today :सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अजूनही हे भाव कमी आलेले नाहीत. सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे.

सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीने ५९,८६० रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा विक्रम गाठला. चांदीचा भाव काही घसरणीसह ६८४८५ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता.

सध्या सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जर तुम्ही सध्या सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सोन्यात गुंतवणूक करून तुम्ही नफा कमवू शकता.

सध्या सोन्या-चांदीच्या बाजारात तेजीचा कल आहे. अमेरिका आणि युरोपसह संपूर्ण जगाचा शेअर बाजार हादरून गेला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सोने ५९ हजारांच्या पुढे पोहोचले आहे.

गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदीत काहीसा दिलासा मिळाला असून मार्च महिन्यात सोन्याचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला सोने ५५ हजारांच्या जवळपास होते. आता येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव ६० हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

तुम्हाला घरबसल्या सोन्या-चांदीचे नवीन दर जाणून घ्यायचे असतील तर ८९५५६६४४३३ वर मिस कॉल देऊन २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. काही वेळानंतर तुम्हाला मेसेजद्वारे सोन्याची नवीन किंमत मिळेल.

तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com आणि mcxindia.com वेबसाइटला भेट देऊन सोन्या-चांदीच्या नवीनतम किंमती जाणून घेऊ शकता.

याआधी २ फेब्रुवारी २०२२ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्या दिवशी सोन्याचा भाव ५८,८८२ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

चांदी अजूनही १८,१८९ रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक ७९,९८० रुपये प्रति किलो आहे.