Gold Rate Today: सुवर्णसंधी! सोन्याच्या किंमतीत घसरण; चांदीचा दरही कमी, काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:54 PM2021-09-24T12:54:17+5:302021-09-24T12:59:53+5:30

Gold Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर घसरले आहेत.

सोनं आणि चांदीच्या दरात गेले काही दिवस चढउतार कायम आहे. गेल्या महिनाभरात अधिक घसरण झाल्याने जवळपास 1200 रुपयांनी दर कमी झाले आहेत. दरम्यान आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याची वायदे किंमत आज 0.04 टक्क्यांनी वाढली आहे, तर चांदीचे दर 0.12 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

सोन्याच्या किंमतीत गुरुवारी घसरण झाली होती. दुसरीकडे, जर चांदीबद्दल बोलायचे झाले तर गुरुवारी चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली, जी अलिकडच्या महिन्यांतील सर्वाधिक आहे.

एमसीएक्सवर आज सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी वाढले आहेत. यानंतर सोन्याचे दर 46,075 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 0.12 टक्क्यांच्या घसरणीनंतर 60,714 रुपये प्रति किलोवर आहेत.

सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा 10,200 रुपयांनी कमी मिळत आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर होते, सोन्याने यावेळी सर्वोच्च स्तर गाठला होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर घसरले आहेत.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.