Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एवढ्या हजारांनी स्वस्त झालं सोनं; चांदी २६८७ रुपयांनी घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 01:46 PM2024-05-31T13:46:22+5:302024-05-31T13:51:04+5:30

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचे दरही कमी झाले आहेत.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शु्क्रवारी सकाळी बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या दरात मोठे बदल झाले आहेत.

Gold Silver Price : आयबीजेए'च्या नवीनतम दरानुसार, आज शुक्रवार, ३१ मे रोजी चांदी प्रति किलो ८८० रुपयांनी स्वस्त झाली असून ९१७९३ रुपयांवर उघडली.

आज चांदीची किंमत २९ मे रोजी ९४२८० रुपये प्रति किलोच्या सार्वकालिक उच्चांकावरून २४८७ रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर, २१ मे रोजीच्या ७४२२२ रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा १९६८ रुपये कमी दराने सोने मिळत आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२२५४ प्रति १० ग्रॅम आहे, २३ कॅरेट सोन्याची किंमत ७१९६५ प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ६६१८५ प्रति १० ग्रॅम आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत ५४१९१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. १४ कॅरेट सोन्याची किंमत ४२२६९ प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा दर ९१७९३ रुपये प्रति किलो आहे.

आज २३ कॅरेट सोन्याचा दर GST सह ७४४२१ रुपये प्रति १० ग्रॅम असेल. इतर शुल्कांसह याची किंमत सुमारे ८१८६३ रुपये असेल.

२२ कॅरेट सोन्याचा दरही आज १३९ रुपयांनी वाढून ६६१८५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, जीएसटी, ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफा जोडल्यानंतर २२ कॅरेटची किंमत ७४९८७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.