Gold Silver Price Today : लग्न सराईपूर्वी सोने झाले स्वस्त, आता दागिने घेण्यासाठी कमी पैसे खर्च होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 18:44 IST2023-01-18T18:32:26+5:302023-01-18T18:44:04+5:30
Gold Silver Price Today : एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Secuirities) याबाबत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : लग्न सराईपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोने स्वस्त झाले आहे. आज सोन्याचा भाव 56500 रुपयांच्या पुढे बंद झाला आहे.
चांदीचे भाव तेजीसह बंद झाले आहेत. चांदी 70,000 च्या खाली बंद झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Secuirities) याबाबत माहिती दिली आहे.
किती स्वस्त झाले सोने?
राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव 105 रुपयांनी घसरून 56,526 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी, गेल्या व्यापार सत्रात सोने 56,631 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
चांदी झाली महाग
चांदीच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर आज त्यामध्ये वाढ झाली आहे. चांदीचा भाव 52 रुपयांच्या वाढीसह 69,694 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
काय आहे एक्सपर्टचे म्हणणे?
दिल्लीतील सोन्याचा स्पॉट भाव 105 रुपयांनी घसरून 56,526 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजच्या एका विश्लेषकाने म्हटले आहे.
एक्सपर्टनी सांगितले की, मंगळवारी डॉलर निर्देशांक 0.18 टक्क्यांनी मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आला. यूएस बाँड उत्पन्न देखील अलीकडील नीचांकी वरून सुधार झाला आहे.
जागतिक बाजारात सोने झाले महाग
जर आपण जागतिक बाजाराबद्दल बोललो, तर विदेशी बाजारात सोने नफ्यासह 1,910 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. चांदीचा भावही वाढून 24.16 डॉलर प्रति औंसवर होता.
असे चेक करा आपल्या शहरातील दर
तुम्हालाही घरी बसून सोन्याचे लेटेस्ट दर तपासायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल.
यासह, अधिक माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com वर डिटेल्स तपासू शकता.