Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 11:37 AM2021-11-09T11:37:31+5:302021-11-09T11:47:12+5:30

Gold, Silver prices today: ऑक्टोबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.04 टक्क्यांनी घसरून 48,000 रुपये प्रतितोळा इतका झाला.

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असतात. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात (Gold and Silver Price Today) घसरण झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.04 टक्क्यांनी घसरला. त्याचवेळी चांदीचे भाव (Silver price) 0.16 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

ऑक्टोबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.04 टक्क्यांनी घसरून 48,000 रुपये प्रतितोळा इतका झाला. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.16 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 64,774 रुपये इतका आहे.

गेल्यावर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही रेकॉर्ड स्तरापेक्षा सुमारे 8200 रुपयांनी स्वस्त आहे.

HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.