सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! खरेदीआधी एका क्लिकवर तपासा आजचे भाव By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:21 AM 2023-12-15T11:21:42+5:30 2023-12-15T11:25:29+5:30
तुम्ही आज सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सोन्याचा भाव आता ६३ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या जवळ पोहोचला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे. सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे, सोन्याचे आणि चांदीच्या दरता आता वाढ झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, पूर्वी ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या वर असणारे सोने आता महाग झाले आहे. आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात. अलीकडे सोन्याच्या दरात घसरण झाली.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती. सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घट झाली होती. सोन्याचा भाव ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आला होता. मात्र, आता त्यात वाढ होताना दिसत आहे.
शुक्रवारी सकाळी सोन्याबरोबरच चांदीच्या जागतिक किमतीतही वाढ दिसून येत आहे. कॉमेक्सवर, चांदीचे फ्युचर्स ०.१० टक्के किंवा ०.०२ च्या वाढीसह २४.४१ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आले. चांदीची जागतिक स्पॉट किंमत २४.१२ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आली.
शुक्रवारी सकाळी जागतिक सोन्याच्या किमतीतही वाढ होत आहे. कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत ०.३१ टक्के वाढीसह २०५१.२० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसत आहे. तसेच सोन्याची जागतिक स्पॉट किंमत सध्या प्रति औंस २०३५.४१ डॉलरवर व्यवहार करताना दिसत आहे.
शुक्रवारी सकाळी, ५ मार्च २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव MCX एक्सचेंजवर ७५,९५९ रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला. तर ३ मे २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी चांदी आज ७५,९६० रुपयांच्या पातळीवर उघडली.
MCX एक्सचेंजवर आज सकाळी, ५ फेब्रुवारी २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी सोने ६२,४७९ रुपये प्रति १० ग्रॅम वाढीसह उघडले. गुरुवारी संध्याकाळी सोने ६२,४५४ रुपयांवर बंद झाले होते. तर ५ एप्रिल २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याने आज उसळी घेतली आणि तो ६२,९५५ रुपयांवर उघडला.