Gold Silver Rate: खुशखबर! सोनं झालं स्वस्त, चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या आजचे भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 04:12 PM2023-11-30T16:12:32+5:302023-11-30T16:15:49+5:30

काल सोन्याच्या दरात वाढ झाली होती, पण आज गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झाली.

तुम्ही जर सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

गुरुवारी दुपारी, ५ फेब्रुवारी २०२४ रोजी डिलिव्हरीसाठीचे सोने MCX एक्सचेंजवर ०.१९ टक्क्यांनी कमी होऊन ६२,६९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे.

बुधवारी सोन्याच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. देशांतर्गत बाजाराबरोबरच जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली.

सोन्याबरोबरच, चांदीच्या देशांतर्गत वायदा किमती देखील गुरुवारी दुपारी घसरल्या. गुरुवारी दुपारी, ५ मार्च २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी चांदी MCX एक्सचेंजवर ०.१७ टक्क्यांनी कमी होऊन ७७,१४० रुपये प्रति किलोवर व्यवहार करताना दिसून आली.

गुरुवारी दुपारी जागतिक सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसत आहे. कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत ०.३३ टक्क्यांनी होऊन २०६०.३० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

तर सोन्याची जागतिक स्पॉट किंमत ०.१६ टक्क्यांनी किंवा ३.२४ डॉलरने कमी होऊन २०४१ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या जागतिक किमतीतही गुरुवारी दुपारी घट झाली. कॉमेक्सवर, चांदीचे वायदे ०.१९ टक्क्यांनी किंवा ०.०५ डॉलरने कमी होऊन २५.२० डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होते.

तर चांदीची जागतिक स्पॉट किंमत ०.१७ टक्क्यांनी किंवा ०.०४ डॉलरने घसरून २४.९८ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.