Gold Silver Rate : अर्थसंकल्पादिवशीच सोन्याने रडवले, दर वाढले; जाणून घ्या आजचे रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 17:26 IST2025-02-01T16:43:56+5:302025-02-01T17:26:21+5:30

Gold Silver Rate : अर्थसंकल्पादिवशीच सोन्याच्या दरात मोठ्या वाढ झाली आहे. आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी आठवा अर्थसंकल्प मांडला आहे. १२ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आता कर भरावा लागणार नाही.

Gold Silver Rate : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी मोठ्या घोषणा केल्या. दुसरीकडे आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

शनिवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव ८२,६०० रुपयांवर गेला. देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर वाढले आहेत. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावर दिसून येत आहेत. २०२४ च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी काढून टाकण्यात आली होती, त्यानंतर सोन्याच्या किमतीत घट दिसून आली.

ज्या सोन्याची मुदत ४ एप्रिल आहे, त्याची किंमत प्रति ग्रॅम ८२,५०० रुपयांवर पोहोचली. शुक्रवारीही सोन्याच्या किमतीत वाढ झाली.

३१ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८२,०९० रुपये नोंदली गेली. २२ कॅरेट सोन्याची किंमत ८०,१२० रुपये आणि २० कॅरेट सोन्याची किंमत ७३०६० रुपये प्रति १० ग्रॅम होती.

इंडियन बुलियन ज्वेलर्सच्या वेबसाइटनुसार, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सोन्यावरील मेकिंग चार्जेस वेगवेगळे असू शकतात. १ फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव काही ठिकाणी ८४ हजार रुपयांपर्यंत प्रति १० ग्रॅम नोंदवला.

मागील अर्थसंकल्पापूर्वी याच दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. अर्थसंकल्पात सोन्याबद्दल घोषणा होताच, किमतीत घसरण नोंदवण्यात आली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली होती की सोन्यावरील सीमाशुल्क १५ वरून ६ टक्क्यांपर्यंत कमी केले जात आहे. या घोषणेनंतरच सोन्याच्या किमतीत प्रति ग्रॅम ४ हजार रुपयांची घसरण झाली.